Pune Crime | पोलिस कर्मचार्‍याकडून शारीरिक व मानसिक त्रास ! WhatsApp व्दारे सुसाईट नोट पाठवून महिला पोलिसाची आत्महत्या, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पोलिस कर्मचाऱ्यांच्या त्रासाला वैतागून एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या (women police employee suicide) केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) दौंड तालुक्यातील देलवडी (Delewdi, Daund) येथे उघडकीस आली आहे. महिला पोलीसाने बुधवारी (दि.3) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली. दिपाली बापुराव कदम Deepali Bapurao Kadam (वय-26 रा. देलवडी, सध्या लोकरी मणिकपूर वसई मुंबई) असे पोलीस नाईक पदावर सेवेत असणाऱ्या मयत महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. महिला पोलिसाच्या आत्महत्येमुळे राज्य पोलिस (Maharashtra Police) दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

मयत दिपाली कदम यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपला भाऊ रोहितला मोबाईलवर सुसाईड नोट (Suicide note) पाठवली आहे. याप्रकरणी पोलीस नाईक वाल्मीक गजानन अहिरे Valmik Gajanan Ahire (रा. पालघर, मुंबई) याच्यावर यवत पोलीस ठाण्यात (Yavat police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आहे. दोन वर्षापूर्वी दिपाली कदम यांची पोलीस खात्यात असणाऱ्या वाल्मीक अहिरे याच्यासोबत ओळख झाली होती. यानंतर आरोपी अहिरे हा वारंवार दिपालीला शाऱीरिक व मानसिक त्रास देत होता.

 

दिपालीचे नुकतेच लग्न जमले होते. तसेच 31 ऑक्टोबर रोजी तिचा साखपुडा झाला होता. 16 नोव्हेंबर रोजी मयूर कांबळे यांच्यासोबत विवाह होणार होता. साखरपुडा आणि लग्नासाठी त्या आपल्या मुळगावी आल्या होत्या. दिपालीचे लग्न जमल्याचे समजल्यानंतर वाल्मीक अहिर याने तिच्या होणाऱ्या पतीला आणि त्यांच्या वडिलांना फोन करुन दिपाली संदर्भात माहिती दिली.

वाल्मीक अहिरे याने मंगळवारी (दि.2) रात्रीच्या सुमारास दिपालीचा भाऊ रोहितला फोन करुन तुम्ही
तिचे इतर कोणाशी लग्न करु नका नाहीतर तुम्हाला मारुन टाकेल अशी धमकी दिली.
मंगळवारी रात्री कुटुंबाने दिपालीला समजावून सांगितले. बुधवारी पहाटे तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाब दिपालीचा भाऊ रोहित कदम यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (Pune Rural SP Dr. Abhinav Deshmukh),
बारामतीचे अप्पर अधीक्षक मिलींद मोहिते (Addl SP Milind Mohite) यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलिस (yavat police station) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Physical and mental harassment by the police officer ! Suicide of a lady police naik by sending a suicide note via WhatsApp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Multibagger Stock | 58 रुपयाचा शेयर 345 रु.चा झाला, केवळ 11 महिन्यात गुंतवणुकदार झाले मालामाल, तुमच्याकडे आहे का?

Nawab Malik | ‘भंगारवाला असल्याचा मला अभिमान’, असे छातीठोकपणे म्हणणाऱ्या नवाब मलिकांची संपत्ती किती? जाणून घ्या

PMC CBSE School | पुण्याच्या बालेवाडीत सुरू होणार महापालिकेची पहिली सी.बी.एस.सी. बोर्डाची शाळा