Pune Crime | पुण्याच्या महिला पत्रकाराचा पोलीस ठाण्यात ‘राडा’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | अ‍ॅट्रॉसिटीच्या (Atrocity) गुन्ह्यामध्ये अटकपुर्व जामिन (Bail) मिळालेल्या एका 35 वर्षीय महिलेनं थेट कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये (Kondhwa Police Station) मोठा राडा केला आहे. त्यामुळे संबधित (Pune Crime) महिलेवर सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात संबंधीत महिलेविरुध्द सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा (FIR) दाखल झाला आहे. याबाबत फिर्याद पोलीस अंमलदार श्रीकांत शिरोळे (Shrikant Shirole) यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, संबंधीत 35 वर्षीय महिलेवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे. न्यायालयाने त्या महिलेला काही अट घालून अटक पुर्व जामिन मंजूर केला आहे. त्यानूसार तीने आठवड्यातून 2 दिवस पोलीस ठाण्यात काही तास येऊन तपासात सहकार्य केले. ती सोमवारी दुपारी पोलीस ठाण्यात दाखल झाली. तीने आल्या-आल्या माझी स्वाक्षरी घ्या मला जायचे आहे. असा सुरसपाटाच लावला. त्यावेळी त्या महिलेला पोलिसांनी आधारकार्ड, मोबाईल नंबर आणि 2 साक्षीदारांचे नंबर मागीतले. पंरतु, ती महिला सहकार्य न करता पोलिसांच्या अंगावर धाऊन आली.

ही महिला कोंढवा खुर्द (Kondhwa Khurd) वास्तव्यास आहे. मात्र, ती स्वत:ला पत्रकार असल्याचे सांगत आहे. असं फिर्यादीने म्हटलं.
या दरम्यान, त्या महिलेनं मोबाईलमधून पोलिसांच्या कामकाजाचे शुटींग सुरु करत पोलिसांवरच आरोप करायला सुरवात केली.
त्यावेळी महिलेला महिला पोलिस कर्मचारी यांनी देखील शांत रहाण्यास सांगितलं मात्र, त्यांनाही धक्का-बुक्की केली. त्यानंतर त्या महिलेवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा (FIR) दाखल झाला आहे.

Web Titel :- Pune Crime | Pune lady journalist in kondhwa police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MVA vs BJP | ‘भाजप-मविआ’मध्ये आरोपांचे राजकीय शीतयुद्ध; फडणवीस सरकारमधील कथित गैरव्यवहार ‘महाविकास’ सरकार बाहेर काढणार?

Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात 130 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Gold Price Today | सोन्याच्या दरात किंचित घट तर चांदी वधारली, जाणून घ्या आजचे दर