Pune Crime | नऱ्हेतील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा; 2 कामगारांवर कुऱ्हाडीने वार करुन रोकड लुटली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील नऱ्हे परिसरात असलेल्या एका पेट्रोल पंपावर (Petrol Pump) सशस्त्र दरोडा (Robbery) टाकल्याची घटना घडली आहे. या घटनेत दरोडेखोरांनी पंपावरील दोन कर्मचाऱ्यावर कुऱ्हाडीने वार करुन 40 हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना मध्यरात्री दीडच्या सुमरास नऱ्हे-आंबेगाव रोड (Narhe-Ambegaon Road) वरील भूमकर पुलाजवळील वीकेडी पेट्रोलियम (VKD Petroleum) या पेट्रोल (Pune Crime) पंपावर घडली.

 

या घटनेत शांतकुमार पाटील (Shantkumar Patil) याच्या डोक्याला व नाकाला तर प्रसाद शेंडकर (Prasad Shendkar) यांच्या डाव्या कानाचे वर कुऱ्हाडीने मारुन गंभीर जखमी केले आहेत. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री पेट्रोल पंपावर काम करणारे दोन कर्मचारी कार्यालयात झोपले होते. मध्यरात्री दीडच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या एका दरोडेखोराने कर्मचाऱ्यांना कुऱ्हाडीचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. त्याने पैसे देण्यास नकार देताच त्याने कर्मचाऱ्याच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घातला.
तर दुसऱ्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण (Beating) करुन 40 हजार रुपये घेऊन पळून गेले.
हा सर्व प्रकार पंपावर असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

 

घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.
आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथके रवाना करण्यात आली आहे.
या घटनेत आणखी किती दरोडेखोर होते का याचा तपास पोलीस करत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | robbery at petrol pump in narhe looted cash by beating with ax two injured pune crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Early Puberty Signs | तुमचा मुलगा किंवा मुलगी अकाली तरुण होत आहेत का? ‘ही’ लक्षणे दिसताच पालकांनी व्हावे सतर्क

 

RMD Foundation | ‘उवसग्गहरं स्त्रोत्र’ पठण केल्याने सर्व दु:खपिडा दूर होतात – शोभा धारिवाल

 

CM Eknath Shinde | पुणे शहरातील रिंगरोडच्या भूसंपादनासाठी MSRDC ला अडीचशे कोटी रुपये वर्ग, मुख्यमंत्र्यांची सभागृहात माहिती