Pune Crime | बहिणीचा मृतदेह विहिरीत सापडल्याने भावाकडून बायकोचा खून; मर्डरनंतर स्वतः केलं ‘हे’ कृत्य, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime | मांडवगण फराटा (Mandavagana Farata) या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आपल्या बहिणीचा मृतदेह विहिरीत आढळून आल्यानंतर भावाने स्वतःच्या पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून (Pune Crime) केला तसेच त्याने स्वतः देखील विष (Poision) प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हि घटना गुरुवारी घडली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, मांडवगण फराटा येथील समीर भिवाजी तावरे (Sameer Bhivaji Taware) यांची बहीण माया सोपान सातव (Maya Sopan Satav) या बुधवारी अचानक घरातून बेपत्ता झाल्या होत्या. कुटुंबियांकडून त्यांचा शोध घेण्यात येत होता पण त्यांचा कुठे थांगपत्ता लागला नाही. यानंतर गुरुवारी माया यांचा मृतदेह विहिरीत तरंगलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर त्यांचा भाऊ समीर याला जबर धक्का बसला.

 

यानंतर समीरने घरी येऊन पत्नी वैशाली तावरे (Vaishali Taware) हिच्यावर धारदार शस्त्राने वार (Pune Crime) करून तिला ठार केले तसेच त्याने स्वतःदेखील विष पिऊन आत्महत्येचा (Pune Crime) प्रयत्न केला. ही बाब नागरिकांना समजताच, त्यांनी समीरला तात्काळ पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. समीर तावरे याच्यावर सध्या दौंड (Daund) येथे उपचार सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच मांडवगण फराटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून पुढील तपास (Pune Crime) सुरु केला आहे.

 

Web Title :- Pune Crime | Sister’s body found in well, murder of wife by brother; He did it himself after the murder

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Tushar Gandhi Slams Kangana Ranaut | ‘दुसरा गाल पुढे करायला हिंमत लागते’; तुषार गांधींनी कंगनाला सुनावले

IND Vs NZ | 2 देश, 2 अर्धशतकं आणि एकसारखा स्कोअर ! न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूने केला अनोखा रेकॉर्ड

Chhagan Bhujbal | SPPU मध्ये लवकरच सावित्रीबाईंचा पुतळा – छगन भुजबळ (व्हिडिओ)

Crime News | धक्कादायक ! प्रियकराच्या लग्नात प्रेयसीनं केलं डायरेक्ट ‘हे’ कृत्य; धक्का सहन न झाल्याने नवरीच्या मामाचा मृत्यू

Thane Crime | उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या महिलेच्या करामतीने पोलिसही चक्रावले; समोर आले तिनं केलेले ‘प्रताप’