Pune Crime | भारत-न्यूझीलंड सामन्यावर सट्टा घेताना तिघांना अटक; 20 लाखाचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) या दोन संघात झालेल्या टी-20 च्या अखरेच्या सामान्यावर सट्टा (Cricket Betting) घेणाऱ्या तिघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch Police) युनिट दोनने बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई पुण्यातील (Pune Crime) कात्रज (Katraj) भागात करण्यात आली आहे. या कारवाईत रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण 20 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

अमर नारायण करपे (वय 30, रा. बीड), अजित पवार (वय 20), महेश मुळे (वय 20, दोघे रा. लातूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांचे साथीदार अविनाश हलगे, आकाश तट, सौरभ देशमुख यांच्यावर गु्न्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार नामदेव रेणुसे (Namdev Renuse) यांनी यासंदर्भात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (bharati vidyapeeth police station) फिर्याद दिली. कात्रज भागातील त्रिमूर्ती चौकात एका इमारतीत क्रिकेट सामन्यावर सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे (Crime Branch Unit Two) वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील (Senior Police Inspector Krantikumar Patil) यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकून कारवाई केली.

कारवाईत रोकड तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले तपास करत आहेत. आरोपींकडून मोबाइल संच जप्त करण्यात आले असून ते दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने सीमकार्ड घेऊन त्याचा वापर सट्टा घेण्यासाठी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. (Pune Crime)

 

Web Title :- Pune Crime | Three arrested for betting on India-New Zealand match; Property worth Rs 20 lakh confiscated by pune police crime branch

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

WHO Europe Office | COVID मुळे यूरोपात होऊ शकतात आणखी 7 लाख मृत्यू, WHO ने हिवाळ्यासाठी दिला गंभीर इशारा

Pune Crime | जुन्या वाड्यात पकडलं? वडीलांशी जिव्हाळ्याच्या मैत्रीचे ‘संबंध’ असल्याच्या रागातून बहिण-भावानं महिलेला केलं ‘खल्लास’

DBSKKV Ratnagiri Recruitment 2021 | कृषी क्षेत्रातील उमेदवारांना नोकरीची संधी ! ‘या’ कृषि विद्यापीठात लवकरच भरती; पगार 35,000 रूपयांपर्यंत

DGP Sanjay Pandey | UPSC पॅनेलच्या शॉर्टलिस्टमध्ये ‘या’ तीन अधिकाऱ्यांची नावे, DGP संजय पाडे यांचे नावच नाही

Customer Care Number साठी तुम्ही सुद्धा करत असाल Google Search तर रिकामा होऊ शकतो खिसा! हॅकर्सचे लक्ष तुमच्या बँक खात्यावर