Pune Crime | मावस भावाच्या मदतीने मुलानेच केला बापाचा खून, कोंढवा पोलिसांकडून दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बोपदेव घाटात (Bopadev Ghat) अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या व्यक्तीचा खून (Murder) करुन मृतदेह घाटात फेकला होता. कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) 24 तासात गुन्हा उघडकीस आणून दोघांना बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. दारु पिल्यानंतर वडिल सातत्याने आईला मारहाण करत असल्याच्या रागातून मुलाने मावस भावाच्या मदतीने वडिलांचा नायलॉन दोरीने गळा आवळून खून (Pune Crime) केला. खून केल्यानंतर पुरवा नष्ट करण्यासाठी मृतदहे बोपदेव घाटात फेकून दिला.

 

पवन देबू शर्मा Pawan Debu Sharma (वय-40 रा. नहेगाव पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मयताचा मुलगा सोनू पवन शर्मा Sonu Pawan Sharma (वय-25 रा. नहेगाव, पुणे मुळ रा. मध्यप्रदेश), मावस भाऊ शैलेंद्र गोवर्धन अहिरवार Shailendra Govardhan Ahirwar (वय-22) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.(Pune Crime)

 

बोपदेव घाटात मृतदेह टाकून दिल्याची घटना 14 जून रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa police station) अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करुन तपास सुरु केला होता. मयत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेत असताना पोलीस नाईक तुषार आल्हाट (Police Naik Tushar Alhat) यांना मयताचे नाव आणि तो राहत असलेल्या ठिकाणाचा पत्ता मिळाला. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन पत्नी यशोदा पवन शर्मा (Yashoda Pawan Sharma) हिच्याकडे चौकशी केली.

चौकशी दरम्यान मयत पवन शर्मा, त्याचा मुलगा सोनू शर्मा आणि बहिणीचा मुलगा शैलैंद्र अहिरवाड असे एकत्र राहत असल्याचे पत्नीने सांगितले.
तसेच पवन याला दारुचे व्यसन होते. दारु पिल्यानंतर तो मुलगा सोनू याला नेहमीच मारहाण करत होता.
13 जून रोजी रात्री पवन याने दारु पिऊन आल्यानंतर पत्नीला दोघांसमोर मारहाण केली.
त्यानंतर ते तिघे रात्रभर घरी परत आले नसल्याची माहिती पत्नीने पोलिसांना दिली. पोलिसांनी सोनू शर्मा आणि शैलेंद्र अहिरवार या दोघांचा शोध सुरु केला. त्यावेळी हे दोघे पुणे स्टेशन (Pune station) परिसरात असून गावी पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. कोंढवा पोलिसांनी पुणे स्टेशन परिसरात दोघांचा शोध घेऊन त्यांना अटक केली.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil),
सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे (ACP Rajendra Galande),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील (Senior Police Inspector Sardar Patil),
पोलीस निरीक्षक गुन्हे जगन्नाथ जानकर (Police Inspector Jagannath Jankar), पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले (Police Inspector Sanjay Mogle)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील (PSI Swapnil Patil),
पोलीस हवालदार सतिश चव्हाण, पोलीस नाईक निलेश देसाई, गोरखनाथ चिनके, जोतिबा पवार,
तुषार आल्हाट, लक्ष्मण होळकर, विशाल ठोंबरे, सागर भोसले, संतोष बनसुडे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | With the help of uncle and brother, the boy killed his father, Kondhwa police arrested both of them

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 2 लाखाची लाच मागणारा सहायक पोलीस निरीक्षक अँटी कप्शनच्या जाळ्यात

 

APY | मिळेल 5000 रूपये पेन्शन, जर 40 व्या वर्षी असे कराल प्लॅनिंग, जाणून घ्या सरकारी स्कीमच्या डिटेल्स

 

Pune PMC News | पालखी सोहळ्यातील ज्येष्ठ वारकर्‍यांना कोरोनावरील लसीचा बूस्टर डोस ! महापालिकेने 20 ठिकाणी केली औषधोपचाराची सुविधा