Pune Crime | पुण्याच्या थेऊरमध्ये छातीत लाथा घातल्याने तरुणाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – टेम्पो चालक आणि दुचाकीस्वारामध्ये झालेल्या किरकोळ अपघातातून झालेल्या वादातून टेम्पो चालकाने तरुणाला छातीत लाथा घातल्या. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यात (Pune Crime) घडली आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) थेऊर येथे घडली आहे. सुंदर शिवा पवार Sundar Shiva Pawar (वय-24 रा. आलिफनगर) असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी सुंदरचा भाऊ विठ्ठल शिवा पवार (वय-35) याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor police station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी टेम्पो चालक आदित्य सुधीर धाराशिवकर (वय-23 रा. कामधेनु इस्टेट, मंत्री मार्केट समोर, हडपसर) याला अटक (Arrest) केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सुंदर आणि त्याचे दोन मित्र दुचाकीवरुन थेऊरच्या दिशेने जात होते. त्याठिकाणी एका मिसळ हॉटेलच्या समोरुन थेऊरच्या (Theur) दिशेने जाणाऱ्या टेम्पोचा सुंदरच्या दुचाकीला कट लागल्याने किरकोळ अपघात (Accident) झाला. सुंदरने टेम्पो चालकाकडे (tempo driver) याबाबत विचारणा केली असता दोघांमध्ये वादावादी सुरु झाली.

यानंतर टेम्पो चालक धाराशिवकर यानं सुंदरच्या छातीत 4 ते 5 लाथा मारल्या.
त्यामुळे सुंदर जमिनीवर बेशुद्ध होऊन पडला. त्यावेळी टेम्पो चालक पळून जात असताना सुंदरच्या मित्रांनी त्याला पकडून ठेवले.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी सुंदरला टेम्पोमध्ये घालून तात्काळ थेऊर येथील रुग्णालयात नेले.
डॉक्टरांनी तपासून त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यास सांगितले.
त्यामुळे त्याला लोणी स्टेशन येथील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून सुंदरला मृत (Pune Crime) घोषीत केली.

Web Titel :- Pune Crime | Young man dies after being kicked in chest in Theur, Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | लग्नाच्या 3 महिन्यानंतर देखील पत्नी ‘हात’ लावू देत नव्हती, पतीच्या हाती लागला मोबाईल अन् ‘लगट’ करतेवेळीचा ‘पर्दाफाश’

PM Maandhan Yojana | 55 रुपये खर्च केल्यास दरमहा बँक अकाऊंटमध्ये येतील 3000 रुपये, जाणून घ्या पूर्ण स्कीम

Home Remedies of Stress Relief | स्ट्रेसमुळे प्रभावित होत असेल वैयक्तिक जीवन, तर ‘हे’ 5 घरगुती उपाय उपयोगी ठरतील; जाणून घ्या