Pune Crime | पुण्याच्या वारजे माळवाडीत सराईत गुन्हेगाराकडून तरूणावर कोयत्याने सपासप वार ! भरदुपारी घडलेली घटना, चौघांविरूध्द FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | गाडीचा धक्का लागल्याने झालेल्या वादात सराईत गुन्हेगाराने साथीदारांसह तरुणावर कोयत्याने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Murder) केला. वारजे माळवाडी (Warje Malwadi News) पोलिसांनी सराईत गुन्हेगार गणेश ऊर्फ गुड्ड्या पटेकर (Ganesh alias Guddya Patekar), त्याचा मित्र चिक्या जगताप (Chikya Jagtap) व त्याच्या इतर दोन साथीदारांविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

याप्रकरणी सोनु रमेश शिंदे (वय २३, रा. रामनगर, वारजे) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार वारजे येथील रामनगरमधील शिवाजी चौकात (Ramnagar, Warje Malwadi) रविवारी दुपारी साडेचार वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश पटेकर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. सोनु शिंदे हा रविवारी सकाळी जात असताना त्यांच्या गाडीचा धक्का चिक्या जगताप याला लागला. त्यावरुन त्यांच्यात वादावादी झाली होती. शिंदे हा दुपारी साडेचार वाजता शिवाजी चौकातून (Shivaji Chowk, Warje Malwadi) जात असताना गणेश पटेकर याने त्याला अडविले. सकाळी काय म्हणत होतास असे म्हणून शिवीगाळ करुन त्याच्याजवळील शर्टात पाठीमागे दडविलेला कोयता काढून फिर्यादीचे डोक्यात मारला. त्याने तो चुकविला. तेव्हा इतर आरोपीने लाकडी बांबुने फिर्यादीच्या पाठीवर मारले. फिर्यादी वार चुकविण्यासाठी पळून जाऊ लागले. तेव्हा त्याच्याबरोबर यश चव्हाण हाही पळून जाऊ लागला. गणेश पटेकर याने त्याच्या हातातील कोयत्याने चव्हाण यांच्या डोक्यात कोयता मारुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Pune Crime) केला. तसेच त्यांच्या मदतीला येणार्‍या लोकांचे अंगावर धावून जाऊन परिसरात दहशत निर्माण केली. पोलीस उपनिरीक्षक पडवळ (PSI Padwal) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Young man stabs youth in Pune’s Warje Malwadi! FIR against four

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | ‘सेक्स’ करतानाचा नकळत काढलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार बलात्कार; पुण्याच्या कोंढव्यातील घटना

Chandrashekhar Bawankule | भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय ! काँग्रेस पुरस्कृत मंगेश देशमुख यांचा दणदणीत पराभव; महाविकास आघाडीची 49 मते फुटली

Pune Crime | पुण्याच्या कोंढाव्यातील आकृती जय डेव्हलपर्सविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल; पैसे घेऊनही फ्लॅट न देता बनावट दस्तावेजाद्वारे पुणे महापालिकेसह ग्राहकाची फसवणुक