पुण्यात सायबर भामटयांकडून दोघांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सायबर गुन्ह्याचा आलेख वाढतच असून, शहरात आज सायबर चोरट्यांनी फसवणूक केल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. यात एका महिलेला पेटीएम खाते बंद होण्याच्या व दुसऱ्या महिलेस रिफंड देण्याच्या बहाण्याने फसविले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी महिला कोरेगाव पार्क परिसरात राहण्यास आहेत.

सायबर चोरट्यानी फिर्यादी यांना तीन दिवसांपुर्वी फोन करुन पेटीएम ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगितले. तुमचे पेटीएम बंद होणार असून, बँकेची माहिती मिळवली. त्यानंतर ऑनलाईनरित्या ९९ हजार ११८ रुपयांची ट्रान्सफर करून फसवणूक केली. दुसऱ्या घटनेत विमानतळ भागातील महिलेला फसविले आहे. त्यांना रिफंडचे पैसे परत करण्याच्या बहाण्याने माहिती दिली.

तसेच त्यांच्याकडून बँकेची गोपनीय माहिती घेऊन बँकखात्यातून 1 लाख रुपयांची फसवणूक केली. संबंधित महिलेने अ‍ॅमेझोनकडून ऑनलाईनरित्या काही वस्तूंची खरेदी केली होती. मात्र, तिने त्या वस्तू न स्वीकारता परत पाठविल्या होत्या. त्यानुसार सायबर चोरट्याने फसविले. याप्रकरणी सायबर पोलिस तपास करीत आहेत.