Pune Erandwane Crime News | घरातून चोरलेले साहित्य सापडले भंगाराच्या दुकानात, एरंडवणे परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Erandwane Crime News | घरातून चोरलेल्या वस्तू भंगाराच्या दुकानात सापडले. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी (Deccan Police Station) एका तरुणावर घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.16) सकाळी नऊच्या सुमारास एरंडवणा परिसरातील वस्तु हॉटेल व्हरांडा पाठीमागील मेहेंदळे गॅरेज रोडवरील (Mehendale Garage Road) एका भंगाराच्या दुकाना समोर घडला आहे. (Pune Erandwane Crime News)

याबाबत शंतनु श्रीकांत गाडगीळ (वय-44 रा. नंदादीप एरंडवणे) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन जावेद मेहबुब अन्सारी (वय-21 रा. मेंहदळे गॅरेज जवळ, कोथरुड, पुणे) याच्यावर आयपीसी 354, 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी शंतनु गाडगीळ यांच्या घरातील 16 हजार 800 रुपये किमतीचे सामान चोरीला गेले होते. गाडगीळ हे शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास मेहेंदळे रोडने पायी जात होते. त्यावेळी एका भंगाराच्या दुकानासमोर त्यांच्या घरातील चोरी झालेल्या वस्तु भंगाराच्या दुकानासमोर आढळून आल्या. त्यावेळी फिर्यादी यांनी दुकानातील व्यक्तीला सामानाबाबत विचारणा केली. दुकानातील व्यक्तीने जावेद याने वस्तु आणल्याची माहिती फिर्य़ादी यांना दिली. फिर्यादी यांनी आरोपीकडे याबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. घरातील सामान जावेद यानेच चोरी केल्याची खात्री फिर्य़ादी यांची झाली. त्यांनी तात्काळ याबाबत डेक्कन पोलिसांना माहिती दिली. पुढील तपास डेक्कन पोलीस करीत आहेत.

महिलेची सोन्याची चैन हिसकावली

हडपसर : हडपसर ब्रीज वरुन जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील 85 हजार रुपये किमतीची 23 ग्रॅम वजनाची
सोन्याची चैन दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी जबरदस्तीने चोरुन नेली (Chain Snatching In Hadapsar).
हा प्रकार शुक्रवारी (दि.15) रात्री पावणे नऊच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी दुचाकीवरील तीन अज्ञात व्यक्तींविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत भेकराईनगर येथे राहणाऱ्या 45 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार लोणकर करीत आहेत. (Pune Hadapsar Crime)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : बसस्टॉपवर गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक, तीन गुन्ह्यातील चार लाखांचा मुद्देमाल जप्त (Video)

Nashik City Police | प्रतिबंधित गुटखा पॅकिंग करणाऱ्या टोळीचा नाशिक पोलिसांकडून पर्दाफाश, साडे नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त (Video)

Parkash Ambedkar On Election Commission | महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान कशासाठी? निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावं, प्रकाश आंबेडकर यांची मागणी

Baramati Lok Sabha Election 2024 | बारामती लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची रणनीती उद्या ठरणार, समन्वय समितीची बारामतीत बैठक

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | देवेंद्र फडणवीसांची CAA कायद्यावरून उद्धव ठाकरेंवर टीका, ”बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा…”

Pune-Baramati-Shirur-Maval Lok Sabha | बारमती मतदारसंघात 7 मे तर पुणे, शिरूर आणि मावळमध्ये 13 मे रोजी होणार मतदान

IAS Rajendra Bhosale | सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम करणार – नवनियुक्त मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले