Pune Fire News | पुण्यात येवलेवाडीतील गोडाऊनला भीषण आग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Fire News | पुण्यातील कोंढवा बुद्रुक (Kondhwa Budruk) येथील येवलेवाडीत गोडाऊनला (Yewalewadi Godown) शुक्रवारी सकाळी भीषण आग (Pune Fire News) लागल्याची घटना समोर आली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या (Fire Brigade) बारा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

 

दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार, कपड्याच्या मोठ्या गोडाऊनला ही आग लागली असून ती वेगाने पसरत असल्याचे समजते. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट देखील पाहायला मिळत आहेत. पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून एकुण 12 अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाले आहेत. 8 फायर इंजिन व 7 वॉटर टँकर आहेत. दरम्यान या आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

 

Web Title :  Pune Fire News | fire at a godown in yevlewadi pune 8 fire tenders reached at spot kondhwa

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा