Pune Fire News | 18 जणांच्या मृत्यूप्रकरणी एसव्हीएस कंपनीचा मालक निकुंज शहाला पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिरंगुट येथील केमिकल कंपनीत लागलेल्या भीषण आग Fire प्रकरणात पोलिसांनी कंपनी मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे, असे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले. या आगीत 18 कामगारांचा होरपळून मृत्यू (Death) झाला आहे. त्यात 15 महिलांचा समावेश आहे. तर 3 पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान, आज (मंगळवार) सायंकाळी कंपनीचा मालक निकुंज शहा याला अटक (ARREST) करण्यात आली आहे. त्याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे पाटील यांनी माहिती दिली आहे.

याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात एसव्हीएस कंपनीचे मालक  निकुंज बिपीन शहा, बिपीन जयंतीलाल शहा, केयुर बिपीन शहा (सर्व रा. सहकार नगर 2, 137 मयुरेश्वर अपार्टमेंट, पुणे) यांच्याविरूध्द भादवि कलम 304 (2), 285, 286, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत मालकांने केलेल्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानंतर हा गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ हे करत आहेत. एमआयडीसी भागात एसव्हीएस केमिकल बनविणारी ही कंपनी आहे. याठिकाणी जंतुनाशकांची निर्मिती केली जाते. तर सॅनिटायझर देखील बनविले जात होते. दरम्यान सोमवारी दुपारी अचानक भीषण आग लागली. यात 18 कामगारांचा मृत्यू Death झाला आहे. दरम्यान, आज गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली होती. आगीची घटना अतिशय दुर्देवी असल्याचे त्यांनी सांगितले होते. गृहमंत्र्यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर काही वेळातच कंपनीच्या मालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. काही वेळातच कंपनीचा मालक निकुंज शहा याला अटक ARREST करण्यात आली आहे.

 

या आगीत मृत्यू झालेल्याची नावे..

 

 

मंदा भाऊसाहेब कुलट (वय 45), संगीता उल्हास गोंदे (वय 36), गीता भारत दिवारकर (वय 38), त्रिशला संभाजी जाधव (वय 33, सर्व रा. उरवडे, ता. मुळशी), सुरेखा मनोहर तुपे (वय 45, रा. करमोळी, ता. मुळशी), सुनिता राहुल साठे (वय 28, रा. भालगुडी, ता. मुळशी), अतुल लक्ष्मण साठे (वय 23, रा. भालगुडी, ता. मुळशी), सारिका चंद्रकांत कुदळे (वय 38, रा. पवळे आळी, पिरंगुट, ता. मुळशी), धनश्री राजाराम शेलार (वय 22) संगीता अप्पा पोळेकर (वय 42), महादेवी संजय आंबारे (वय 35, सर्व रा. पिरगुंट कॅम्प, ता. मुळशी), अर्चना व्यंकट कवडे (33), शीतल खोपकर, मंगल बबन मरगळे, सुमन संजय ढेबे, सीमा सचिन बोराडे (वय 30), सचिन मदन घोडके (वय 25) यांचा मृत्यू झाला.

ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी
आगीत 18 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला.
मृतांत Death 15 महिलांचा समावेश आहे.
कामगारांचे मृतदेह पूर्णपणे जळाले असल्याने त्यांची ओळख पटत नाही.
त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी आता मृतदेहांची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भीषण आगीत मृत्युमुखी Death पडलेल्या कामगारांच्या नातेवाईकांच्या रक्ताचे नमुने (ब्लड सॅम्पल) घेण्यात येतील.
डीएनए चाचणी तसेच रक्तांच्या नमुन्याद्वारे मृतांची ओळख पटविण्यात येणार असल्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.
मृतांची लवकरात लवकर ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येणार आहे.
पुण्यातील पाषाण रस्त्यावर असलेल्या न्यायवैद्याकीय प्रयोगशाळेसह नाशिक, औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत डीएनए चाचणी करण्यासाठी नमुने पाठविण्यात येणार आहेत.

 

Also Read This : 

 

खासदार नवनीत राणांची CM ठाकरेंवर जळजळीत टीका, म्हणाल्या – ‘तुम्ही लायक असता तर दिल्लीत येण्याची गरजच नव्हती’

फाटलेल्या टाचा काही दिवसातच होतील ‘मुलायम’, वापरा हे DIY Foot Mask

कामाची गोष्ट ! App बनावट आहे कि Fake? डाउनलोड करण्यापूर्वी ‘हे’ लक्षात ठेवा, अन्यथा…

त्वचा-आरोग्य आणि प्रतिकारशक्तीसाठी रामबाण उपाय आहे टोमॅटोचा रस; ‘या’ पध्दतीनं बनवा, मिळतील ‘हे’ फायदे, जाणून घ्या

राज्यात 28 मेपर्यंत 5126 लोकांना म्युकरमायकोसिसची लागण

Dahi-Kishmis Benefits : तंदुरूस्त रहायचे असल्यास दह्यामध्ये मनुक्यासोबत मिक्स करा फक्ती ‘ही’ एक गोष्ट, मिळतील आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या