पुणे जिल्ह्यात एकतर्फी प्रेम प्रकरणातून भर रस्त्यात हवेत गोळीबार, तरुणाला पोलिसांनी पकडलं, सर्वत्र खळबळ

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – एकतर्फी प्रेम प्रकरणातून तरुणाने भर रस्त्यात हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नारायणगाव परिसरात हा प्रकार घडला आहे. या गोळीबारामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तरुणाला पोलिसांनी पाठलाग करून पकडले आहे.

अक्षय भाऊसाहेब दंडवते (रा. वाफगाव, ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी आणि आरोपी अक्षय हे मंचरमधील एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. त्यावेळी पासून त्यांची ओळख आहे. तरुणाचे फिर्यादी तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. तरुणी त्याच्या प्रेमाला नकार देत होती. दरम्यान तरुणी सध्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करते. रविवारी रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास तरुणी रस्त्याने जात असताना नारायणगाव 14 नंबर जाबुत फाटा येथे तरुणाला अडविले.

तसेच तिला माज्यासोबत चल असे म्हणून विचारले. तरुणीने त्याला नकार दिला. यावरून वाद झाल्यानंतर रागाच्या भरात त्याने कंबरेला लावलेले पिस्तुल काढून हवेत गोळीबार केला. यामुळे एकच खळबळ उडाली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे नागरिकही भिती भरली होती. याची माहिती मिळताच नारायणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणीने घडलेली घटना सांगितल्यानंतर पोलिसांनी अक्षयचा शोध सुरू केला.

यावेळी तरुण नाशिक येथे पळून जात असताना त्याला आळेफाटा भागात नारायणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मानसिंग खोचे, पोलीस कर्मचारी सचिन कोबल, वाघमारे, गारगोटे ,पालवे, लोहोटे, पठारे यांनी 2 तासात ताब्यात घेतले आहे.