सदानंद शेट्टींच्या वसंत बारमध्ये बिलावरून सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार

पोलीसांकडून माहिती देण्यास टाळाटाळ, पोलीस कोणाला वाचवत आहेत...

पुणे, पोलीसनामा ऑनलाईन – राजकीय नेते सदानंद शेटींच्या वसंत बारमध्ये बिलावरून ग्राहक व वेटरमध्ये झालेल्या वादात सुरक्षा रक्षकांने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. मात्र, स्थानिक पोलीस ही माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याने नेमके पोलिस कोणाला वाचवत आहेत, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

याप्रकरणी सरकारतर्फे पोलीस कर्मचारी रविकांत कदम यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, वेटर आणि मद्यपान करण्यास आलेल्या एकूण 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार पेठेत वसंत बार हे हॉटेल आहे. याठिकाणी तिघेजन रात्री साडे नऊच्या दरम्यान मद्यपान करण्यासाठी आले होते. त्यांनी मद्यपान केले. परंतु, यानंतर बिलावरून वेटर आणि त्यांच्यात वाद झाला. वाद चांगलाच विकोपाला गेल्यानंतर हॉटेलच्या सुरक्षा रक्षकाने त्याच्याजवळील बंदूकीतून हवेत एक गोळी झाडली. यानंतर एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, यामध्ये पोलीसांनी एकूण 13 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यात एकालाही अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान, समर्थ पोलीसांकडून मात्र, या गुन्ह्याची माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे पोलीसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. तपाशी अंमलदार आणि वरिष्ठ निरीक्षक कार्यक्रमात असल्याने माहिती देऊ शकत नसल्याचे उत्तर दिले. तर, पोलीस ठाण्याकडून आम्ही एतक्या आरोपींचे नावे नाही देऊ शकत माहिती देण्यास वरिष्ठांनी नकार दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पोलीस नेमकी माहिती लपवून कोणाला वाचवत आहेत, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/