Pune Hadapsar Crime | पुणे : तरुणीकडे पाहून भररस्त्यात अश्लील हावभाव, आरोपीला हडपसर पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Hadapsar Crime | अल्पयीन मुलीचा वारंवार पाठलाग करुन तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव करुन विनयभंग (Molestation Case) केला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघांवर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे. हा प्रकार डिसेंबर 2023 ते शनिवार (दि.16) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान हडपसर परिसरातील वैदवाडी येथे घडला आहे. (Pune Hadapsar Crime )

याबाबत 17 वर्षाच्या पीडित मुलीने रविवारी (दि.17) हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन अविनाश शंकर आलकुंटे (वय-35), सुनिल शंकर आलकुंटे (वय-40 दोघे रा. शंकरमठ, आलकुंटे वस्ती, वैदवाडी, हडपसर) यांच्यावर आयपीसी 354, 354 (अ) (ड), 452, 509, 506, 34 सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अविनाश आलकुंटे याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पीडित तरुणीचा डिसेंबर 2023 पासून वारंवार पाठलाग केला. शनिवारी सायंकाळी मुलगी तिच्या घरी जात असताना आरोपी अविनाश याने मुलीकडे पाहून अश्लील हावभाव करुन घाणेरडे आवाज काढले. तसेच तिला काडीने टोचून तिच्यासोबत जवळीस साधण्याचा प्रयत्न केला. मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून आरोपीने तिच्या घरात जबरदस्तीने घुसून तिच्यासोबत अश्लील बोलून विनयभंग केला. तसेच तिला धमकी दिल्याचे फिर्य़ादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुपवर अश्लील मेसेज करुन विनयभंग

लोहगाव : व्हॉट्सअॅप ग्रुपवर (WhatsApp Group) महिलेबाद्दल अश्लील मेसेज करुन विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित 43 वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.16) रात्री सव्वा आठच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी केशव क्षिरसागर (वय-32) व भैरवनाथ गायकवाड (वय-28) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

आरोपींनी फिर्यादी यांच्याबद्दल व्हॉट्सअॅप ग्रुपवर अश्लील मेसेज केला.
तसेच व्हॉट्सअॅप कॉल करुन अश्लील शिवीगाळ करुन धमकी दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shrinivas Pawar On Ajit Pawar | राष्ट्रवादी फोडल्याने संपूर्ण कुटूंबच दादांवर नाराज, आता सख्ख्या भावाने फिरवली पाठ, श्रीनिवास पवार म्हणाले… (Video)

RMD Foundation | आर एम डी फाऊंडेशन उभारणार शेतकऱ्यांसाठी ‘ऍग्रीकल्चर नॉलेज हब’ – शोभाताई आर धारीवाल

Pune CP Office New Building | पुणे पोलीस आयुक्तालयाचे रुप पालटणार, राज्य सरकारकडून 193 कोटींचा निधी

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : बसस्टॉपवर गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक, तीन गुन्ह्यातील चार लाखांचा मुद्देमाल जप्त (Video)

Nashik City Police | प्रतिबंधित गुटखा पॅकिंग करणाऱ्या टोळीचा नाशिक पोलिसांकडून पर्दाफाश, साडे नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त (Video)

Parkash Ambedkar On Election Commission | महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान कशासाठी? निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावं, प्रकाश आंबेडकर यांची मागणी

Baramati Lok Sabha Election 2024 | बारामती लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची रणनीती उद्या ठरणार, समन्वय समितीची बारामतीत बैठक

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | देवेंद्र फडणवीसांची CAA कायद्यावरून उद्धव ठाकरेंवर टीका, ”बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा…”