Pune Kasba Chinchwad Bypoll Elections | भाजपच्या कसबा, चिंचवडच्या उमेदवारांची दिल्लीहून घोषणा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Chinchwad Bypoll Elections | गेली अनेक दिवस कोणाला उमेदवारी मिळणार याविषयी चर्चेला उधाण आले असताना भारतीय जनता पक्षाने कसबा आणि चिंचवडमधील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात कसब्यात बदल करण्यात आला असून चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (Pune Kasba Chinchwad Bypoll Elections)

 

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने (BJP) टिळक घराण्यात उमेदवारी न देता दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त हेमंत रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी दिली आहे.

 

मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर कसबा व चिंचवडमध्ये पोटनिवडणुक होत आहे. (Pune Kasba Chinchwad Bypoll Elections)

कसब्यातून कोणाला उमेदवारी द्यावी, याचा भाजपसमोर मोठा पेच होता. शेवटी भाजपने मुक्ता टिळक यांचा मुलगा कृणाल याची प्रवक्तेपदी निवड केली. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शुक्रवारी रात्री अचानक टिळकवाड्याला भेट देत. शैलेश टिळक (Shailesh Tilak) यांची बंद दरवाजा आड चर्चा केली होती. तेव्हाच टिळक यांच्या घरात उमेदवारी देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार आज सकाळी कसब्यामधून हेमंत रासने याची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

 

Web Title :- Announcement of BJP Kasba, Chinchwad candidates from Delhi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा