Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | बोलघेवडे पोपट ED च्या तालावर नाचू लागले, राष्ट्रवादीने उडवली मनसेची खिल्ली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवडमधील पोटनिवडणुकीत राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी सर्वच पक्षांना केली होती. भाजपने (BJP) देखील तसा आग्रह धरला होता. परंतु, मागील काही निवडणुकांचा दाखला देत महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. चिंचवडमधून राष्ट्रवादीने (NCP) तर कसब्यातून काँग्रेसने (Congress) उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना दोन्ही मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीत मनसे (Pune MNS) कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर मनसेने दोन्ही मतदारसंघात (Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election) भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा जाहिर केला आहे.

 

चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीत मनसेचा पाठिंबा भाजपला असल्याचे मनसेचे नेते बाबू वागसकर (Babu Vagaskar) यांनी सांगितले. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (NCP Pune City President Prashant Jagtap) यांनी मनसेची खिल्ली उडवली आहे. बोलघेवडे पोपट ED च्या तालावर नाचू लागले, असं ट्विट प्रशांत जगताप यांनी केलं आहे.

प्रशांत जगताप म्हणाले, कोथरुड मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जोरावर उमेदवारी अर्ज भरणारे आते कसब्यात भाजपला पाठिंबा देताय. बोलघेवडे पोपट ED च्या तालावर नाचू लागले. अशी खिल्ली त्यांनी उडवली आहे. तसेच साहेब किती दिवस तुम्ही दुसऱ्यांच्या वरातीत सुपारी घेऊन नाचणार? कधीतरी तुम्हीही घोड्यावर बसा असा सल्ला देखील प्रशांत जगताप यांनी दिला आहे.

 

Web Title :- Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | Bolghevad parrot danced to the tune of ED, NCP mocked MNS

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Police News | गुन्ह्याच्या उत्कृष्ट तपासाबद्दल केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्यातील 43 पोलीस अधिकाऱ्यांचा पदक देऊन सन्मान

Rajgad Fort | पुणे जिल्ह्यातील राजगड किल्ल्यावर रात्रीच्या मुक्कामाला बंदी, उल्लंघन केल्यास…

Pune Crime News | मोक्का गुन्ह्यात दीड वर्ष फरार असलेल्या शेवाळे टोळीच्या प्रमुखाला कोंढवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या