पती, सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पती आणि सासरच्या मंडळीकडून होणार्‍या सततच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. लग्नात हुंडा अन सोन कमी दिल्यावरून मानसिक व शारिरीक त्रास दिला जात होता. अमृता नवनाथ फरताडे (वय 28) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर, याप्रकरणी तिचा पती नवनाथ फरताडे (वय 37, रा. अंदोरा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) व सासरच्या लोकांवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अमृता यांच्या आई अनिता पिंगळे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृता व नवनाथ यांचा 2012 मध्ये रितीरिवाजाने विवाह झाला होता. नवनाथ हा मुळचा उस्मानाबाद जिल्ह्यातील अंदोरा गावचा रहिवाशी आहे. लग्नानंतर कामानिमित्त ते पुण्यातील वानवडी येथील काळेपडळ परिसरात राहत होते. दरम्यान, नवनाथ व त्याचे आई-वडिल तसेच इतर अमृता यांना लग्नात हुंडा आणि सोने कमी दिल्यावर टोचून बोलत होते.

तसेच, त्यांना सासरच्यांकडून पैसे घेऊन येण्यासाठी सतत मानसिक व शारिरीक त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून अमृता यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले. अधिक तपास उपनिरीक्षक जोगदंड हे करत आहेत.

Visit : Policenama.com