Pune Molestation Case | पुणे : महिलेचा पाठलाग करुन विनयभंग, पती व मुलाला धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Molestation Case | महिलेचा ती राहत असलेल्या सोसायटीपर्यत पाठलाग केला. महिला लिफ्टने घरी जात असताना लिफ्टमध्ये तिच्यासोबत गैरवर्तन करुन विनयभंग केला. महिलेने पती आणि मुलाला बोलावून घेतले असता त्यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threats) दिली. हा प्रकार 22 मार्च रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास औंध (Aundh) येथे घडला आहे.

याबाबत 45 वर्षीय महिलेने शनिवारी (दि.30) चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshrungi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून सचिन पोळेकर (रा. पोळेकर निवास, भाऊ पाटील रोड, बोपोडी) याच्यावर आयपीसी 341, 354, 354(ड), 427, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Molestation Case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी महिला त्यांची लॅब बंद करुन घरी जात असताना आरोपीने पाठलाग केला. महिला सोसायटीत गेली असता आरोपीने महिलेची हातातील पर्स घेऊन मला बोलायचे आहे असे म्हणून महिलेला थांबवण्याचा प्रयत्न केला.
महिला लिफ्टमधून घरी जात असताना आरोपीने लिफ्टमध्ये घुसून महिलेचा हात पकडून गैरवर्तन केले.
त्यावेळी महिलेने त्यांच्या पतीला व मुलाला बोलावून घेतले असता आरोपीने फिर्यादी व
त्यांच्या पती व मुलाला बघुन घेण्याची धमकी देऊन निघून गेला.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुजाता शामने (API Sujata Shamne) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Court News | WhatsApp द्वारे हॉटेलमध्ये चालवल्या जाणाऱ्या बालेवाडी येथील हायप्रोफाईल सेक्स रॅकेट मधील आरोपीला न्यायालयाकडून जामीन मंजूर

Supriya Sule On BJP | सुप्रिया सुळेंचा भाजपावर गंभीर आरोप, भाजपाने आमचे घर फोडले, मोठ्या भावाची बायको आईसारखी…

Chhagan Bhujbal | छगन भुजबळ नाशिकमधून लोकसभा लढवणार?