Pune NCP – Chintamani Dnyanpeeth | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि चिंतामणी ज्ञानपीठाच्यावतीने 3 जुलै रोजी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरूजन गौरव सोहळ्याचे आयोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune NCP – Chintamani Dnyanpeeth | शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि चिंतामणी ज्ञानपीठाच्या संयुक्त विद्यमाने सोमवार ३ जुलै रोजी गुरूपौर्णिमेनिमित्त गुरूजन गौरव सोहळयाचे (Gurujan Gaurav Sohala) आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सकाळी ९ ३० वाजता स्वारगेट (Swargate) येथील गणेश कला क्रिडा रंगमंच (Ganesh Kala Krida Manch) येथे हा कार्यक्रम होईल. (Pune NCP – Chintamani Dnyanpeeth)

गुरूजन गौरव सोहळ्याचे हे १८ वे वर्ष आहे. यावर्षी ज्येष्ठ कला दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, माजी आमदार उल्हास पवार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ, ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सचे अध्यक्ष रमणलाल लुंकड या गुरूजनांचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजक माजी नगरसेवक विजय उर्फ अप्पा रेणुसे (Appa Renuse) यांनी दिली. (Pune NCP – Chintamani Dnyanpeeth)

गुरूजन गौरव सोहळ्याच्या निमित्ताने आतापर्यंत डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर, दादा वासवानी, डॉ. चारूदत्त आपटे, डॉ. के.बी.ग्रॅन्ट, अनु आगा, लिला पुनावाला, जयंत नारळीकर, चंदू बोर्डे, डॉ. के.एच.संचेती, प्रा.द.मा. मिरासदार, एच.व्ही. सरदेसाई, योगाचार्य बी.के.एस. अयंगार, निरंजन पांड्या, डॉ. शरद हार्डीकर, नारायण महाराज, डॉ. संप्रसाद विनोद, शांतीलाल मुथ्था, सुचेता चाफेकर, जयमाला शिलेदार, विद्या बाळ, बी.आर. खेडकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डी.एस.खटावकर, रवी परांजपे, नाना पाटेकर, डॉ. एस.बी. मुजुमदार, आबासाहेब मगर, डॉ. वि.दा. कराड, उत्तमराव पाटील, डॉ. अनिल अवचट, मुक्ता मनोहर, ऍड. भास्करराव आव्हाड, ले.ज. डी.बी. शेकटकर आदी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला आहे.

Web Title :  Pune NCP – Chintamani Dnyanpeeth | organized Gurujan Gaurav Sohala on 3rd July in the presence of Ajit Pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा