Pune News | सोशल मीडियावर पक्ष चोरल्याची टीका करताना अपंगत्वावर भाष्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या सोशल मीडिया सह राज्य प्रमुखावर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune News | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फाटाफुट झाल्यानंतर आता कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांवर पातळी सोडून टीका केली जाऊ लागली आहे. त्यातूनच मग एका सोशल मीडिया प्रदेशाध्यक्षाच्या अपंगत्वावर टीका केल्याने हवेली पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.(Pune News)

याबाबत सतिश हरीभाऊ नागवडे (वय ३६, रा. बाबुळसर, ता. शिरुर) यांनी हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १४८/२४) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या सोशल मीडिया सहराज्य प्रमुख मोहसीन आझाद शेख (रा. नांदेड सिटी, सिंहगड रोड), योगेश सावंत (रा. बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नागवडे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिरुर तालुका अध्यक्ष आहे. त्यांच्या गटाचे सोशल मीडिया प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे (रा़ न्हावरा, ता. शिरुर) हे आहेत.

सुदर्शन जगदाळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ऑडिओ क्लीप तिच्या बॅकग्राऊंडला सुदर्शन जगदाळे व सुहास मेटे यांचे फोटो व
ही आपली लायकी तसेच पक्ष चोरणार्‍यांचा सोशल मीडिया असे लिहिलले आहे. ही ऑडिओ क्लिप मोहसीन शेख यांनी
त्यांचे फेसबुक वरुन व्हायरल करण्यात आली. ही ऑडिओ क्लिप २ मिनिटे १९ सेकंदाची असून त्यामध्ये सुदर्शन जगदाळे यांचे अपंगत्वाबद्दल बोलून त्यांना समाजामध्ये अपमानीत करण्यात आले.

मोहसीन शेख हे शरद पवार गटाचे सहराज्य प्रमुख सोशल मीडिया पदावर आहेत.
त्यांनी आपल्या घरातून ही ऑडिओ क्लिप प्रसारित करुन जगदाळे यांची समाजात बदनामी केली असल्याचे फिर्यादीत
नमूद केले आहे. ही आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप योगेश सावंत यांनी त्याचे फेसबुक अकाऊंटवर व्हायरल करुन जगदाळे
यांची बदनामी केली आहे. हवेली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Sunil Kamble | अखेर पोलिसांच्या अर्जित रजेचा शासन निर्णय रद्द, आमदार सुनील कांबळेकडून निर्णयाचे स्वागत

Pune Cheating Fraud Case | मोठा परतावा देण्याच्या आमिषाने 13 जणांची 17 कोटींची फसवणूक, बिबवेवाडी परिसरातील प्रकार

पुणे : सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Pune Cyber Crime | लोन क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी गुगलवर सर्च केला अन् खाते झाले क्लिअर; ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी घातला गंडा

मारहाण करुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चंदननगर परिसरातील घटना

Raj Thackeray-Manohar Joshi | मनोहर जोशींच्या निधनानंतर राज ठाकरेंचा शोकसंदेश, ”शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न…”

Maharashtra IAS Transfers | राज्यातील 12 सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्या ! कविता व्दिवेदी यांची पुण्याच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त पदी नियुक्ती तर पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या संचालकपदी कार्तिकी एन एस यांची नियुक्ती

Pune Bibvewadi Crime | पुणे : सिनेस्टाईल पाठलाग करुन तरुणावर धारदार हत्याराने वार, दोन सराईत गुन्हेगारांवर FIR