Pune News | ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान,स्वतः कोरडे पाषाण’; NCP च्या कार्यालय उद्घाटन कार्यक्रमावरुन अजित पवार ‘ट्रोल’

पुणे (Pune News) : बंगालमधील गर्दीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करणार्‍या NCP च्या कार्यकर्त्यांनी शनिवारी कार्यालय उद्घाटनाच्या कार्यक्रमात केलेल्या गर्दीवर सोशल मिडियावर जोरदार चर्चा सुरु असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठ्या प्रमाणावर ‘ट्रोल’ केले जात आहे. त्याचवेळी या कार्यक्रमांबाबत पुणे (Pune News) पोलिसांनी ‘चुप्पी’ साधली आहे.

 

MP Sanjay Raut | ‘राष्ट्रनिष्ठा’, ‘स्वामीनिष्ठा’ यावरून संजय राऊत यांचा मोदी सरकारवर निशाणा

दुसर्‍यावर टिका करणार्‍या व सोशल डिस्टंसिंगचा दररोज सल्ला देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत दादांच्या अंगातही सोशल डिस्टंसिंगऐवजी लसीकरणानंतरची चुंबकीय शक्ती तयार झालेली दिसते. बंगालमधील गर्दीसाठी नरेंद्र मोदींवर टिका करणार्‍या एनसीपी कार्यकर्त्यांची गर्दी संतापजनक आहे. सामान्यांना सांगे ब्रम्हज्ञान अन आपण कोरडे पाषाण, अशी टिका होत आहे.
सकाळी अजित पवारांनी पुणेकरांनी गर्दी केली, तर कडक लॉकडाऊन लावेल, अशी तंबी दिली होती. संध्याकाळी त्यांच्याच पक्षाने अशा तोबा गर्दीत त्यांना अडकवले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

जाहीर कार्यक्रमातील संख्येची बाब मंत्र्यांनी गंभीरपणे घ्यावी, असे अजित पवार यांनी दुपारी १ वाजता सांगितले.
सायंकाळी ६ वाजता सर्व निर्बंध झुगारुन राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे उद्घाटन अशा एकाच वृत्तपत्रातील दोन बातम्या शेजारी शेजारी लावून त्या ट्विटरवर पोस्ट करण्यात आल्या आहेत.

 

 

भारतीय जनता पक्षाच्या आमदार व नेत्यांनी तर एनसीपीच्या या कार्यक्रमावर जोरदार टिका केली आहे.
चमकोगिरीसाठी माहीर असलेल्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांना पुण्यात संकटात घालण्याचा कोणी अधिकारी दिला असा प्रश्न भाजपने उपस्थित केला आहे.
गृहखाते स्वत:कडे असणारी राष्ट्रवादी स्वत:च्या कार्यकर्त्यांवर सामान्यांप्रमाणे गुन्हे दाखल करणार का?
चमकोगिरीसाठी गर्दी करणे म्हणजे कोरोना योद्धांचा अपमान नाही का?
कोरोनाचे नियम धाब्यावर बसविणार्‍या राष्ट्रवादीला पुणेकरांनी का माफ करावे? असे प्रश्न विचारले आहेत.

ajit pawar troll because of ncp new office opening program

पोलिसांची चुप्पी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कार्यक्रमाला इतक्या मोठ्या संख्येने लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी कशी दिली.
वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या उपस्थितीत हजारोंच्या संख्येत कार्यक्रम होत असताना त्यांनी हस्तक्षेप का केला नाही, असे अनेक प्रश्न या निमित्ताने विचारले जात आहे.

सामान्यांवर दंडुका उगारणार्‍या पोलिसांना हे राजकीय कार्यक्रम दिसत नाही का, का त्यावेळी त्यांनी डोळ्यावर कातडे ओढलेले असते.
यापूर्वीही आमदाराच्या विवाह सोहळ्याला सर्व पक्षीय नेते उपस्थित होते. तेथे मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त होता. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले तरीही पोलिसांनी एकावरही गुन्हा दाखल केला नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

त्याचवेळी सामान्यांच्या एखाद्या कार्यक्रमात अनाहूतपणे काही लोक अधिक झाले तर त्यांच्यावर कारवाई करायला हेच पोलीस सरसावतात.
सोशल मिडियावर अनेक बाबींवर मिम्स टाकणारे, त्यावरुन लोकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करणारे पुणे पोलिसांचे सोशल मिडिया या ट्रोलवर मात्र सोयिस्करपणे चुप्पी साधून बसले आहे.

हे देखील वाचा

 

Pune News | पुण्यात पोलीस उपनिरीक्षकासह 5 पोलिसांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई, पोलीस दलात खळबळ


Covid Health Insurance Policy | कोरोना हेल्थ इन्शुरन्स घेत आहात तर वेटिंग पीरियडसह ‘या’ 10 गोष्टींकडे ठेवा लक्ष, जाणून घ्या

 

IRCTC iPay | झटपट बुक होते तिकिट आणि कॅन्सलेशननंतर मिनिटात मिळतो रिफंड, जाणून घ्या फीचर्स

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune News | ajit pawar troll because of ncp new office opening program

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update