Pune News | बांग्लादेश युद्धात पाकिस्तानवर भारताने मिळविलेल्या विजयाच्या 50 व्या वर्षानिमित्त ‘सुवर्ण विजय’ द्विसप्ताहाचे आयोजन – आबा बागुल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | भारताने १९७१ मध्ये झालेल्या युद्धात पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयाच्या ५० वर्षानिमित्त महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल (PMC Congress Group Leader Aba Bagul) यांच्यावतीने ३ डिसेंबरपासून शिवदर्शन (Shivdarshan) येथील कै. वसंतराव बागुल उद्यानामध्ये ‘सुवर्ण विजय’ द्विसप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. यानिमित्ताने ३ ते १६ डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बागुल यांनी पत्रकार (Pune News) परिषदेत दिली.

 

बागुल (Aba Bagul) यांनी सांगितले, की १९७१ मध्ये झालेल्या युद्धामध्ये भारताने पाकिस्तानला पराभूत करून स्वतंत्र बांग्लादेशची निर्मिती केली.
या घटनेला पन्नास वर्षे होत असून यानिमित्ताने ‘सुवर्ण विजय’ द्विसप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. या युद्धात वापरण्यात आलेला टी ५५ हा रणगाडा लष्कराने महापालिकेला भेट दिला असून तो बागुल उद्यानात ठेवण्यात आला (Pune News) आहे. ३ डिसेंबरला या रणगाडा प्रदर्शनीच्या उदघाटनाने या कार्यक्रमांना सुरूवात होणार आहे. यासोबतच भारतरत्न पं.भीमसेन जोशी कलादालनात भारत – पाक युद्धाच्या छायाचित्रांचे प्रदर्शन, ऐंशी फूट पाण्याच्या पडद्यावर भारत पाक युद्धाच्या थ्रीडी लेझर चित्रफित, १९७१ चे युद्ध या विषयावर निबंध स्पर्धा, नामवंत चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन, एक स्वाक्षरी शहीद जवानांच्या अभिवादनासाठी, घोरपडी येथील युद्धस्मारकास पुष्पचक्र अर्पण आदी उपक्रम या द्विसप्ताहात करण्यात येणार आहेत.

 

Web Title :- Pune News | Two weeks of Golden Victory organized to mark the 50th anniversary of India’s victory over Pakistan in the Bangladesh war – Aba Bagul

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Astrological Medical Center | ‘या’ ठिकाणी सरकारी रूग्णालयात देशातील पहिले ज्योतिष वैद्यकीय केंद्र ! जन्मकुंडली, हस्तरेषा आणि राशिफळ पाहून आजारावर उपचार

Pune News | …तर मेट्रो प्रकल्प 2 वर्षे रेंगाळणार व खर्चही 70 कोटी रुपयांनी वाढणार ! गणेश मंडळांनी डिझाईन बदलाचा आग्रह मागे घेण्याची महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून विनंती

Pune Crime | राज्यस्तरीय खेळाडूच्या बनावट प्रमाणपत्रांवर बनला सहायक पोलीस उपनिरीक्षक, पर्दाफाश झाल्यानंतर पुण्यात FIR