दुर्दैवी ! पुणे पोलीस दलातील आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा ‘कोरोना’मुळे मृत्यू

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुणे पोलीस दलातील आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. यापूर्वी एका सहायक उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे शहर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

दीपक सावंत (वय 42, रा. सोमवार पेठ लाईन) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

दीपक सांवत हे वाहतूक शाखेत कार्यरत होते. त्यांची नेमणूक समर्थ वाहतुक विभागात होती. कर्तव्यावर असताना दिपक यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. मात्र उपचारादरम्यान आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. ही माहिती कळताच वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली आहे. त्यांच्या मृत्यूने पुणे पोलीस दलात मोठी खळबळ माजली आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दीपक यांच्या पश्चात आई, पत्नी, 3 मूल असा परिवार आहे.

दरम्यान राज्यात दोन दिवसांपूर्वीच्या माहितीनुसार 1328 हुन अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये 136 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रात 12 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. 324 हुन अधिक पोलीस बरे होऊन घरी परतले आहेत. तर 992 पोलिसावर उपचार सुरु आहे.