Pune Paud Road Accident | भरधाव पीएमपीच्या धडकेत महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू, कोथरुड परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Paud Road Accident | पौड रस्त्यावर कचरा डेपो परिसात पीएमपी बसच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीस्वार तरुण जखमी झाला आहे. याप्रकरणी पीएमपी चालकाविरुद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) गुन्हा दाखल केला आहे. हा अपघात शनिवारी (दि.16) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास झाला. (Pune Paud Road Accident)

माही मयुर गांधी (वय-19 रा. शोभा ऑप्टिमा बिल्डींग, माणिकबाग, सिंहगड रस्ता) असे मृत्यू झालेल्या महाविद्यालयीन तरुणीचे नाव आहे. तर मंदार नानवटी हा जखमी झाला आहे. याबाबत पोलीस अंमलदार अमोल शरद नजन (वय-24) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन PMPML Bus चालकावर आयपीसी 279, 304(अ) सह मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार मंदार आणि त्याची मैत्रिण माही पौड रस्त्याने एमआयटी महाविद्यालयाकडे सकाळी सातच्या सुमारास जात होते. कचरा डेपोसमोरील सार्वजनिक रोडवर भरधाव दुचाकी घसरली. त्यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव पीएमपी बसच्या चाकाखाली माही सापडली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या माहीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर मंदार जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने,
सहायक पोलीस निरीक्षक बाबर, पोलीस उपनिरीक्षक पांढरे यांनी घटनास्थळी भेट दिली.
पसार झालेल्या पीएमपी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून,
पोलीस उपनिरीक्षक बसवराज माळी तपास करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : बसस्टॉपवर गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक, तीन गुन्ह्यातील चार लाखांचा मुद्देमाल जप्त (Video)

Nashik City Police | प्रतिबंधित गुटखा पॅकिंग करणाऱ्या टोळीचा नाशिक पोलिसांकडून पर्दाफाश, साडे नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त (Video)

Parkash Ambedkar On Election Commission | महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान कशासाठी? निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावं, प्रकाश आंबेडकर यांची मागणी

Baramati Lok Sabha Election 2024 | बारामती लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची रणनीती उद्या ठरणार, समन्वय समितीची बारामतीत बैठक

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | देवेंद्र फडणवीसांची CAA कायद्यावरून उद्धव ठाकरेंवर टीका, ”बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा…”

Pune-Baramati-Shirur-Maval Lok Sabha | बारमती मतदारसंघात 7 मे तर पुणे, शिरूर आणि मावळमध्ये 13 मे रोजी होणार मतदान

IAS Rajendra Bhosale | सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम करणार – नवनियुक्त मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले