Pune Pimpri Chinchwad Crime News | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, दागिने अन् पैसे लुबाडले; पुण्यातील नऱ्हे येथील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केले. तसेच तिच्या घरातील सोन्याचे दागिने (Gold Jewelry) व रोख रक्कम जबरदस्तीने घेऊन गेला. हा प्रकार 12 ते 23 डिसेंबर या दहा दिवसांच्या कालावधीत पीडित मुलीच्या (Pune Rape Case) नऱ्हे येथील घरी घडला आहे. याप्रकरणी बारामती तालुक्यातील एका व्यक्तीवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत 24 वर्षीय तरुणीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन सचिन पंडीत जाधव Sachin Pandit Jadhav (वय-33 रा. तरडवली, मोरगाव ता. बारामती) याच्यावर आयपीसी 376, 376(2 (एन), 417, 380, 323, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. 12 ते 23 डिसेंबर या कालावधीत शिवीगाळ व मारहाण (Beating) करुन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच पीडित तरुणीच्या घरातील 75 हजार रुपयांचे 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख 30 हजार रुपये असा एकूण 1 लाख 5 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने घेऊन गेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लाड (PSI Lad) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

हडपसर परिसरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 77 वी स्थानबध्दतेची कारवाई

”मोदींनी मंदिरही बनवलं आणि तारीखही सांगितली”, पंतप्रधानांचे कौतुक करत मुख्यमंत्र्यांचे ठाकरेंवर टीकास्त्र

”घरचे लग्न असल्यासारखे निमंत्रण पत्रिका वाटत सुटलेत”, राम मंदिरावरून संजय राऊतांची जोरदार टीका

एकनाथ खडसे यांचा मोठा दावा, ”महाविकास आघाडीला ३५ ते ४० पेक्षा जास्त जागा मिळतील”

मविआच्या जागावाटपाबाबत अशोक चव्हाण स्पष्टच म्हणाले, बाकीच्या पक्षांशी अद्याप बोलणी नाही, फार्म्युला…