Pune Pimpri Chinchwad Crime News | पोलिसांनी कुख्यात बाळा वाघेरेच्या मुसक्या आवळल्या, राहत्या घरातून अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पैशाच्या व्यवहारातून बाळा वाघेरे आणि त्याच्या साथीदारांनी एकाचे अपहरण केल्याची तक्रार पोलिसांकडे प्राप्त झाल्यानंतर चिंचवड पोलिसांनी (Chinchwad Police) वाघेरेला त्याच्या घरातून ताब्यात घेतले आहे. त्यामुळं प्रचंड खळबळ उडाली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
यासंदर्भात 29 वर्षीय व्यापाऱ्याने फिर्याद दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी बाळा वाघेरे, राहुल उणेचा आणि हरीश चौधरी (रा.वाल्हेकरवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि हरीश चौधरी यांच्यात पैशांची देवाण-घेवाण झाली होती. फिर्यादीने हरीश चौधरी याच्याकडून घेतलेली सगळी रक्कम परत केली होती. त्यानंतर देखील तो त्यांना पैसे मागत होता.
आरोपींनी आपआपसात प्लन करून त्यांचे अपहरण केले आणि त्याला बाळा वाघेरेच्या घरी नेले.
त्याच्याकडे खंडणी मागण्यात आली. नकार दिल्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली.
फिर्यादीने पैसे देण्याचे कबूल करून थेट पोलिस स्टेशन गाठले.
फिर्यादीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करत बाळा वाघेरेला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले.
यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
Web Title :- Chinchwad Police Arrest Gangster Bala Waghere Pune Pimpri Crime News
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Suresh Hemnani | महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीच्या सदस्यपदी सुरेश हेमनानी यांची नियुक्ती