Pune Pimpri Chinchwad Crime News | पार्क केलेली दुचाकी पडल्याने एकाला बेदम मारहाण, हॉटेल चालकासह सात जणांवर FIR; हिंजवडीमधील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | दुचाकी काढताना पार्क केलेली दुचाकी पडल्याच्या कारणावरुन सहा ते सात जणांच्या टोळक्याने एका व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी व लाकडी बांबूने बेदम मारहाण (Beating) करुन गंभीर जखमी केले. ही घटना हिंजवडी येथील ग्रँड हाई स्ट्रीट मॉलच्या (Grand High Street Mall) शेजारी असणाऱ्या चौपाटीसमोर बुधवारी (दि.6) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी हॉटेल चालकासह सात जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत सौरभ श्रीदिपककुमार शर्मा Saurabh Srideepak Kumar Sharma (वय-39 रा. ईओन होम्स, फेज-3, हिंजवडी) यांनी गुरुवारी (दि.7) हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून सुनील रोकडे, द टी-लिशियस हॉटेलचे (The T-Licious Hotel) चालक विशाल पाटील (Vishal Patil) व अनोळखी चार ते पाच जणांवर आयपीसी 324,323, 504, 143, 147, 149 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांनी त्यांची दुचाकी मॉलच्या शेजारी असलेल्या चौपाटीसमोर पार्क केली होती. मॉलमधून परत आल्यावर फिर्यादी हे त्यांची बुलेट काढत होते. त्यावेळी समोरील दुचाकी पडली. दुचाकी पडल्याच्या कारणावरुन आरोपींनी फिर्यादी यांच्याजवळ येऊन इथे दुचाकी का पार्क केली, तुझ्यामुळे माझी दुचाकी पडली असे म्हणत शिवीगाळ केली.

यावर फिर्यादी यांनी ‘मी दोन वेळा दुचाकी पार्क केली, त्यावेळी कोणी काहीच बोलेले नाही’ असे म्हणाले.
याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी यांना हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.
तर आरोपी विशाल पाटील याने त्याठिकाणी पडलेल्या लाकडी दांडक्याने फिर्य़ादी यांच्या पाठीत मारले.
तर इतर आरोपींनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत फिर्य़ादी यांच्या डोक्याला व पाठीला गंभीर दुखापत
झाली आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

तळवडे परिसरातील फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग, सहा महिलांचा होरपळून मृत्यू, 8 जण गंभीर

पुण्यात प्रियांक खर्गे यांच्याविरोधात आंदोलन, सावरकरांबद्दलच्या वक्तव्यानंतर भाजप युवा मोर्चा आक्रमक

Maharashtra Assembly Winter Session 2023 | कांदा निर्यातबंदी, इथेनॉल निर्मितीवरील बंदीबाबत अजित पवार सभागृहात म्हणाले, ”गरज पडल्यास…”

Shweta Tiwari Hot Photo | श्वेता तिवारीच्या मादक अदेवर चाहते झाले घायाळ, पाहा व्हायरल फोटो..

किराणा माल विक्रेत्या व्यावसायिकाची 10 लाखांची फसवणूक, हडपसर परिसरातील प्रकार

Ajit Pawar | नवाब मलिकांसंदर्भातील फडणवीसांच्या पत्रावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले – ”त्या पत्राचे काय करायचे ते…”

Pune Crime News | जास्तीचे पैसे देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ महिलेची फसवणूक, येरवडा परिसरातील प्रकार