Pune Pimpri Chinchwad Crime News | हातात पिस्टल घेऊन परिसरात माजवली दहशत, निगडी येथील घटना; आरोपी गजाआड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | हातात पिस्टल (Pistol) घेऊन परिसरात दहशत पसरवणाऱ्या तरुणाला निगडी पोलिसांनी (PCPC Police) अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल जप्त करण्यात आले आहे. हा प्रकार सोमवारी (दि.4) रात्री आठच्या सुमारास ट्रान्सपोर्टनगर (Transport Nagar) येथील रायगड हॉटेल जवळ घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

आदर्श उर्फ छोट्या अशोक मगर (वय-24 रा. मधुकर पवळे शाळेसमोर, ओटास्कीम निगडी, पुणे) याच्यावर आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस अॅक्ट (Maharashtra Police Act), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. याबाबत पोलीस नाईक बाळासाहेब महालींग नंदुर्गे यांनी निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi Police Station) फिर्य़ाद दिली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आदर्श उर्फ छोट्या मगर याने ट्रान्सपोर्टनगर येथील सार्वजनिक रोडवर हतात
देशी बनावटीचे पिस्टल घेऊन परिसरात दहशत माजवली. हातातील पिस्टल उंचावून मोठमोठ्याने ओरडून लोकांना
धमकवले. याबाबत निगडी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून 25 हजार रुपये किंमतीचे देशी बनावटीचे पिस्टल जप्त केले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सातपुते (PSI Satpute) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | रुपाली चाकणकर यांच्या विरोधात सोशल मीडियावर अश्लील पोस्ट करणारे सायबर पोलिसांच्या ताब्यात

Congress Nana Patole | शिंदे-फडणवीस-पवार सरकारने गुन्हेगारीत महाराष्ट्राला युपीच्या पंगतीत बसवले : काँग्रेस

सोसायटीच्या चेअरमन पदावरुन दोन ज्येष्ठांमध्ये जुंपली; परस्परविरोधी गुन्हे दाखल

Shivsena UBT | अदानी आणि सरकारला शिवसेना विचारणार जाब, १६ डिसेंबरला मुंबईत मोर्चा

Pune Bhidewada Smarak | पुणे महापालिकेने अवघ्या चोवीस तासात ऐतिहासिक भिडे वाडा ताब्यात घेण्याची प्रक्रिया पुर्ण केली; मध्यरात्री धोकादायक वाडा पाडल्यानंतर आजही सर्वोच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांना चपराक