Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : कॉलेजमध्ये मुलीला काय बोलला म्हणत तरुणाला मारहाण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | तु कॉलेजमध्ये कोणत्या मुलीला काय बोलला असे म्हणत आठ जणांच्या टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण (Marhan) करुन जखमी केले. हा प्रकार शनिवारी (दि.30) दुपारी दोनच्या सुमारास कडदे मावळ (Maval) येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime)

याबाबत साहील बाळासाहेब देशमुख (वय-19 रा. कडदे मावळ) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन विशाल काकडे (रा. माण), नागेश (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यासह इतर चार ते पाच जणांवर 324, 323, 143, 146, 149 सह महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमीनल लॉ अमेडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी साहिल देशमुख याला तू कॉलेजमध्ये कोणत्या मुलीस काय बोलला, असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. विशाल काकडे याने साहिल याला प्लास्टिकच्या पाईपने पाठीत मारहाण करून जखमी केली. लाथा बुक्क्यांनी मारहाण करत याला लय माज आला आहे.
याला मारा असे म्हणून शिवीगाळ केली.
आरोपींनी मोठमोठ्याने आरडाओरडा करत सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवलल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पांचाळ करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Court News | WhatsApp द्वारे हॉटेलमध्ये चालवल्या जाणाऱ्या बालेवाडी येथील हायप्रोफाईल सेक्स रॅकेट मधील आरोपीला न्यायालयाकडून जामीन मंजूर

Supriya Sule On BJP | सुप्रिया सुळेंचा भाजपावर गंभीर आरोप, भाजपाने आमचे घर फोडले, मोठ्या भावाची बायको आईसारखी…

Chhagan Bhujbal | छगन भुजबळ नाशिकमधून लोकसभा लढवणार?

Maharashtra Sadan Scam | महायुतीला धक्का! अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ अडचणीत? उद्यापासून सुरू होणार ‘या’ प्रकरणाची सुनावणी