Pune Pimpri Crime | ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि तू मला…’, तळेगावमध्ये तरुणीचा भररस्त्यात विनयभंग

तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे…,’ असे म्हणत एका 19 वर्षांच्या मुलीचा भररस्त्यात हात पकडत तिच्यासोबत गैरवर्तन करून विनयभंग केला. ही घटना सोमवारी (दि.28 नोव्हेंबर) सायंकाळी पाचच्या सुमारास तळेगाव-चाकण रोडवर घडली. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा (Pune Pimpri Crime) दाखल करण्यात आला आहे.

 

प्रशांत दाभाडे (रा. भौर, ता. मावळ), सुतार (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात आयपीसी 354, 354 (ड), 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 19 वर्षांच्या तरुणीने बुधवारी (दि.30 नोव्हेंबर) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ब्यूटी पार्लरच्या क्लासहून पायी घरी जात होत्या.
त्यावेळी आरोपींनी तरुणीचा पाठलाग केला. प्रशांत दाभाडे याने तरुणीचा हात पकडून ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि तू मला खूप आवडते,’ असे म्हणत गैरवर्तन केले. तसेच मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले, तर फिर्यादी यांच्या जाण्या-येण्याची माहिती आरोपी दाभाडे याला देणारा सुतार याने फिर्यादी यांच्याकडे पाहून हात-वारे केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इंगळे करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Talegaon Dabhade molestation case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Udayanraje Bhosale | माझ्यामुळे भाजपची अडचण होत असेल, तर… – उदयनराजे भोसले

MNS Chief Raj Thackeray | सिंधुदुर्गमध्ये एन्ट्री करताच राज ठाकरेंचा विरोधकांना सूचक इशारा, म्हणाले…

Police Recruitment | तृतीयपंथींचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण होणार, ‘मॅट’ने दिले महत्त्वाचे आदेश

Grampanchayat Elections | अनेकांना ग्रामपंचायतीचा उमेदवारी अर्ज न भरता आल्यामुळे निवडणूक आयोग स्वीकारणार ऑफलाइन अर्ज; अर्ज भरण्याच्या वेळेतही वाढ