Pune Police | उद्या पुण्यात बंदोबस्तासाठी 7000 पोलीस तैनात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  Pune Police | कोरोना संकटामुळे गत वर्षीप्रमाणेच यंदाही गणेश विसर्जन मंडपातच करण्यात येणार आहे. विसर्जन घाटावर मूर्ती विसर्जनास बंदी करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी फिरत्या हौदांची सोय असणार आहे. विसर्जनदिनी शहरातील सर्व दुकाने बंद राहणार आहे. विसर्जनासाठी ७ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (pune police commissioner amitabh gupta) यांनी सांगितले.

विसर्जनावेळी प्रमुख गणेश मंडळांनी शहर पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करत गुप्ता म्हणाले, सकाळी १० वाजता मिरवणूक सुरु होईल. तर मानाच्या सर्व गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन संध्याकाळी ७ वार्जपर्यंत करण्यात येणार आहे. यावेळी नागरिकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळावेत.

सात हजारांवर पोलिसांचा (Pune Police) बंदोबस्त

होमगार्ड- ४५०,

एसआरपीएफ- ४

तुकड्या, दंगल विरोधी १० पथके,

बॉम्ब शोधक व नाशक ८ पथके,

शीघ्र कृती दल १६ पथके,

सर्व पोलीस ठाण्यातंर्गत १ हजार १०० कर्मचारी,

गुन्हे शाखेतील २०० कर्मचारी,

विशेष शाखेतील १०० कर्मचारी,

स्ट्रायविंग फोर्स १० पथके,

गुन्हे शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखेची २० पथके,

विशेष पोलीस अधिकारी एसपीओ १ हजार २००

 

Web Title : Pune Police | 7000 police deployed pune ganesh immersion day immersion idols immersion ghats strictly prohibited

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

BJP MP Join TMC | भाजपला मोठा धक्का ! मोदी सरकार 2.0 मध्ये मंत्री राहिलेल्या BJP खासदाराचा TMC मध्ये प्रवेश

Nagpur News | नागपुरमधील बुटीबोरी येथे 50 खासगी रुग्णालये एकत्र येऊन उभारणार Oxygen प्लांट

Ajit Pawar | ‘सहकारी बँकामधील केंद्राच्या हस्तक्षेपाविरोधात अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…