पुणे पोलिसांकडून गणेश मंडळांसाठी आगमनपासून विसर्जनापर्यंतची नियमावली जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दरवर्षी धुमधडाक्यात साजरा होणाऱ्या पुण्यातील वैभवशाली गणेशोत्सवाला यंदा मात्र कोरोनाच्या आचारसंहितेचे विघ्नपाठी लागले आहे. पुणे पोलिसांनी गणेशोत्सव मंडळांसाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार बाप्पाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत पोलिसांच्या नियमावलीचे पालन करणे मंडळांना बंधकारक करण्यात आले आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांनी सुरक्षित आणि शांततेत पार पाडावा असे आवाहन केले आहे. शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेउन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आचारसंहिता पाळावी लागणार आहे. मंडळांसह नागरिकांना गणेश मुर्ती ऑनलाईनरित्या बुक करावी, असे सांगण्यात आले आहे. बाप्पांच्या आगमनासाह विसर्जन मिरवूणकीला बंदी घालण्यात आली आहे. त्याशिवाय कमीत कमी कार्यकर्त्यांत उत्सव साजारा करावा लागणार आहे.

अशी आहे पोलिसांची गणेशोत्सवासाठीची आचारसंहीता
गणेश मुर्ती खरेदी
– गणेश मुर्तीची खरेदी ऑनलाईन पद्धतीने करावी
– यंदा स्टॉलला पदपथ, रस्त्यांवर परवानगी नाही
– शाळांची पटांगणे, मोकळ्या जागांवर स्टॉलला परवानगी

श्री गणेश आगमन
– आगमन व विसर्जन मिरवणुक काढू नये
– आगमन व विसर्जनासाठी कमीत कमी नागरीकांची उपस्थिती

श्री गणेश प्रतिष्ठापना
– सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्रींच्या मुर्तीची प्रतिष्ठापना मंदिरातच करावी
– अनन्यसाधारण परिस्थितीत मनपाच्या नियम व अटींचे पालन करुनच छोट्या मंडपांना परवानगी
– सार्वजनिक मंडळांसाठी श्रींच्या मुर्तीची उंची चार फुट व घरगुती गणपतीसाठी दोन फुट असावी

श्री गणेश पुजा
– आरती व पुजेसाठी 5 व्यक्तींचे बंधन, बाहेरील व्यक्तींचा सहभाग असू नये
– सॅनिटायझर, मास्क व सोशल डिस्टंसींग अनिवार्य

गणेश दर्शन
– दर्शनासाठी ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक आदी माध्यमांचा वापर करावा
– ऑनलाईन व्यवस्था नसल्यास छोटे व्हिडीओ बनवून पाठवावेत
– दर्शनासाठी ऑनलाईन टोकन, डिजीटल पास द्यावा व सामाजिक अंतराचे पालन करावे
– कोणत्याही निमंत्रीत किंवा व्हिआयपी व्यक्तींना दर्शनासाठी आमंत्रीत करु नये

सुरक्षा
संशयीत किंवा बेवारस वस्तू आढळून आल्यास ताबडतोब पोलिसांना खबर द्यावी. मौल्यवान दागिने असणाऱ्या मंडळांनी संरक्षणाची विशेष काळजी घ्यावी. श्रीच्या मुर्तीचे रक्षणाकरीता कमीत कमी पाच कार्यकर्ते अथवा खासगी सुरक्षा रक्षक 24 तास हजार असावेत

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना
केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशाचे पालन करावे. व्यक्तींमध्ये कमीत कमी संपर्क यावा याची खबरदारी घ्यावी. प्रतिबंधित क्षेत्रात असलेल्या अटी व नियमांचे काटेखोर पालन करावे. गणेश मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्यांनी सेतू ऍप वापरणे बंधणकारक आहे.

पोलिस मदतीसाठी संपर्क क्रमांक
नियंत्रण कक्ष – 100/26126296/26122880
वाहतूक नियंत्रण कक्ष – 26685000
विशेष शाखा नियंत्रण कक्ष -26208286