घरफोडी करणाऱ्या चोरट्याला पुणे पोलिसांनी केली अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे शहरातील आंबेगाव, कात्रज परिसरात घरफोडी करणाऱ्या चोरट्याला पाच महिन्यानंतर अटक करण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून पाच गुन्हे उघडकीस आणून १ लाख ५४ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई २४ सप्टेंबर रोजी गायमुख चौकात सायंकाळी पाचच्या सुमारास करण्यात आली होती.

दिपक राजेंद्र निखळ (वय-१९ रा. साईबाबा मंदीराजवळ, वेताळनगर, आंबेगाव बु. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ea5ea0ee-c56c-11e8-a3f2-c1d293ea4fb7′]
पाच महिन्यांपूर्वी राजस सोसायटीत दिवसाढवळ्या घरफोडी करणारा चोरटा गायमुख चौकात येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी उज्वल मोकाशी व शिवदत्त गायकवाड यांना मिळाली. पोलिसांनी खासगी वाहनाचा वापर करुन गायमुख चौकात सापळा रचला. बातमीदाराने केलेल्या वर्णाचा एक तरुण गायमुख चौकात दिसला. पोलिसांनी त्याला अटक करुन चौकशी केली. चौकशी दरम्यान राजेंद्र निखळ याने साथिदाराच्या मदतीने कात्रज, आंबेगाव परिसरात दीड वर्षापासून घरफोडी करत असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून घरफोडी गुन्ह्यातील सोन्याचे दागिने, वाहनांमधून चोरलेले दागिने, मोबाईल असा एकूण १ लाख ५४ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील ५ गुन्हे उघडकीस आले आहेत. घरफोडी गुन्ह्यातील त्याच्या साथिदाराचा पोलीस शोध घेत असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक शिवदास गायकवाड करीत आहेत.
[amazon_link asins=’B0793PRJRP,B01G1NRRTG’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9d7c29b9-c56c-11e8-93b3-b154dd3ae150′]
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग रविंद्र सेनगावकर, परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रविंद्र रसाळ, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विष्णू ताम्हाणे यंच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक शिवदास गायकवाड, सहायक पोलीस फौजदार प्रदीप गुरव, पोलीस हवालदार विनोद भंडलकर, श्रीधर पाटील, गणेश सुतार, प्रणव सकपाळ, उज्वल मोकाशी, समीर बागसिराज, दत्तात्रय पवार, सुमित मोघे, जगदीश खेडेकर यांच्या पथकाने केली.

जाहिरात