ठाण्यातून सरकारी वाहन चोरुन धूम ठोकणारा चोरटा पुणे पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

ठाणे जिल्ह्यातील चेंदणी कोळीवाडा येथून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सरकारी वाहन चोरुन धुम ठोकणाऱ्या चोरट्याला सिंहगड पोलिसांनी पाठलाग करुन अटक केली. ही कारवाई धायरीफाटा ते नांदेड सिटी रोडवर सोमवारी (दि.३) करण्यात आली. अटक करण्यात आलेला चोरटा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या चेंदणी कार्य़ालयात साफसफाईचे काम करतो.
[amazon_link asins=’B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3dda9ab1-b032-11e8-9700-7b9110a7aaf7′]

अमित हरदान बाईंक (वय-१९ रा. मच्छीमार झोपडपट्टी, दार्जीलींग रोड, पश्चिम बंगाल) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.

सोमवारी सिंहगड रोड पोलिसांचे तपास पथक धायरीफाटा ते नांदेड सिटी रोडवर गस्त घालत होते. त्यावेळी एक पिवळा दिवा असलेली पांढऱ्या रंगाची टाटा सुमो (एमएच ०४ एएन ८५५) रोडने वेगात जाताना दिसली. पोलिसांनी वाहन चालकाला थांबण्याचा इशारा केला मात्र वाहन चालकाने गाडी न थांबवता निघून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन काही अंतरावर अडवले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने ठाणे जिल्ह्यातील चेंदणी काळोवाडा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालतून गाडीची चोरी केल्याची कबुली दिली. कार्य़ालयातून गाडीची चावी चोरुन वाहन चोरल्याची कबूली दिली. आरोपी हा या कार्यालयात साफसफाईचे काम करतो. गाडी चोरल्यानंतर तो फिरत पुण्यात आला होता.
[amazon_link asins=’B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’43d117d6-b032-11e8-ad88-7dc671d05650′]

ही कारवाई परीमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त बाजीराव मोहीते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता यादव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गिरीष सोनवणे, पोलीस कर्मचारी दत्ता सोनवणे, अमित पदमाळे, सागर कुंभार, दया तेलंगे पाटील, यशवंत औंबासे, वामन जाधव यांच्या पथकाने केली.

मराठी बातम्या तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा
policenama App …

प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट