Pune Police Crime Branch News | पुणे पोलिस क्राईम ब्रँच न्यूज : सामाजिक सुरक्षा विभाग – बंडगार्डनच्या हद्दीतील जुगार अड्डयावर छापा, 8 जणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑलनाइन – Pune Police Crime Branch News | पुणे शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell Pune) गुरूवारी बंडगार्डन पोलिस स्टेशनच्या (Bundgarden Police Station) हद्दीतील ताडीवाला रोड (Tadiwala Road Pune) परिसरातील जुगार अड्डयावर छापा (Rain On Gambling Den) टाकला. त्यामध्ये 8 जणांवर कारवाई करण्यात आली असून 17 हजार 320 रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. जुगार खेळताना मिळुन आलेल्या आणि पाहिजे असलेल्या आरोपीविरूध्द बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Police Crime Branch News)

ताडीवाला रोड परिसरात काहीजण कल्याण मटका जुगार (Mataka Jugar) खेळत व खेळवत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. प्राप्त माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाने (Samajik Suraksha Vibhag Pune) जुगार अड्डयावर छापा टाकला. तेथे 7 जण जुगार खेळताना आढळून आली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकुण 17 हजार 320 रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या 7 आणि पाहिजे असलेल्या आरोपीविरूध्द बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम 12 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Police Crime Branch News)

 

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende)
यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव (Sr PI Bharat Jadhav),
सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी पाटील (API Ashwini Patil), सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे (API Aniket Pote), पोलिस अंमलदार अजय राणे, मनिषा पुकाळे, किशोर भुजबळ, संदीप कोळगे आणि ओंकार कुंभार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Web Title :- Pune Police Crime Branch News | Social Security Cell Pune raid on gambling den in Bundagarden area, action taken against 8 persons

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Shrikant Shinde | ‘निवडणुकीची खुमखुमी असेल तर…’, खा. श्रीकांत शिंदेंचं उद्धव ठाकरे गटाला थेट आव्हान (व्हिडिओ)

Aryan Khan Cruise Case | आर्यन खान प्रकरणी समीर वानखेडेंवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची छापेमारे

Chitra Wagh | ‘उद्धवजी, ज्या दिवशी तुम्ही राजीनामा दिला त्याच दिवशी महाविकास आघाडीचा पोपट मेला, कायद्याची भाषा समजत नसेल तर…’

Nana Patole on Ajit Pawar | अजित पवारांच्या आरोपांना नाना पटोलेंचे प्रत्युत्तर, म्हणाले-‘अजित पवार खोटं बोलत आहेत, राजिनाम्याची कल्पना…’