Pune : कोविड जम्बो हॉस्पीटलमधून गायब झालेल्या महिलेला पोलिस अन् नोतवाईकांनी शोधलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   कोव्हीड जम्बो हॉस्पिटलमधून गायब झालेल्या महिलेला पोलीस आणि नातेवाईकांनी अखेर शोधून काढले. ती महिला पिरंगुट परिसरात सापडली. तिला सुखरूप आई-वडिलांच्या ताब्यात दिले. दहा दिवसांपूर्वी ही महिला गायब झाल्याचा प्रकार समोर आला होता. ती मनोरुग्ण असल्याचे सांगण्यात आले.

वानवडी परिसरातील 33 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्यानंतर 29 ऑगस्टला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ती मनोरुग्ण आहे. ससून मधून तिला काही दिवसांनी शिवाजीनगर येथील जम्बो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे उपचार सुरू होते. पण ती गोंधळ करत असल्याने येथील डॉक्टरांनी तिच्या आईला बोलावून याची माहिती दिली. तसेच त्यांना 13 किंवा 14 तारखेला सोडण्यात येईल असे सांगितले. महिलेची रुग्णालयात गेल्यानंतर ती गायब असल्याचे समजले. यानंतर ही महिला गायब झाल्याची माहिती समोर आली आणि प्रशासन जागे झाले. पण तिला डिस्चार्ज दिल्याचे येथील डॉक्टरांकडून सांगण्यात येत होते. मात्र तिच्या नातेवाईकांनी ती गायब असल्याने या रुग्णालयासमोरच बसून उपोषण केले व शिवाजीनगर पोलिसाकडे तक्रार केली होती. यानंतर नातेवाईक आणि शिवाजीनगर पोलीस तिचा शोध घेत होते.

दरम्यान उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी लक्ष घालत वरिष्ठ निरीक्षक कोपनर व पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे, उपनिरीक्षक अनिल बिनवडे, किसन राठोड, मोरे, चव्हाण, पोलीस हवालदार राजपूत, सय्यद, शेवरे, रासकर व कर्मचाऱ्यांनी या महिलेचा शोध सुरू केला. उपनिरीक्षक बिनवडे यांनी स्वतः पीपीई किट घालून पूर्ण जम्बो रुग्णालय फिरून शोध घेतला. पण ती सापडली नाही. मग परिसरातील सीसीटीव्ही पडताळणी केली. गेल्या दहा दिवसापासून पोलीस व नातेवाईक या महिलेचा शोध घेत होते. त्या महिलेचे फोटो सर्वत्र व्हायरल केले काही पोस्टर देखील तयार करून तिचा शोध घेतला जात होता. यादरम्यान ही महिला पिरंगुट परिसरात असल्याचे समजले. त्यानंतर पोलिस व नातेवाईकांनी सकाळपासून तिचा या परिसरात शोध घेतला. त्यावेळी दुपारी आज ही महिला सापडली. ती व्यवस्थित होती. तिला घेऊन सुखरूप नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

दरम्यान ही महिला नेमकी कधी रुग्णालयातून गायब झाले हे समजू शकलेले नाही. दरम्यान महिला मनोरुग्ण असून, तिच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like