Pune Police News | माऊंट एव्हरेस्ट मोहीमेवर गेलेले पुणे पोलीस दलातील स्वप्नील गरड ‘ब्रेन डेड’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police News | पुणे पोलीस दलात कार्यरत असणारे पोलीस नाईक स्वप्नील गरड (Police Naik Swapnil Garad) यांना काठमांडू (Kathmandu) येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. स्वप्नील गरड यांना ब्रेन डेड (Brain Dead) झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती पुणे पोलीस दलातील गरड यांच्या मित्रांनी दिली. (Pune Police News)

स्वप्नील गरड हे पुणे पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेत (EoW Pune) कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी एव्हरेस्ट शिखर (Mount Everest) सर करण्यासाठी गेले होते. मात्र प्रकृती खालावल्यामुळे त्यांना काठमांडू येथील रुग्णालायत उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांना ब्रेन डेड झाल्याची माहिती त्यांच्या पुणे पोलीस दलातील मित्रांनी दिली. सध्या त्यांच्यावर काठमांडू येथे उपचार सुरु आहेत.

 

स्वप्निल गरड हे एक उत्तम गिर्यारोहक असून त्यांनी यापूर्वी जगातील अनेक शिखर सर केले आहेत.
(Pune Police News) दरम्यान, स्वप्नील गरड यांनी मागील
वर्षी जगातील सार्वात सुंदर आणि चढाई करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या कठीण
असलेले नेपाळमधील माउंट अमा दबलम (Mount Ama Dablam in Nepal) हे शिखर सरक केले होते. हे शिखर सर केल्यानंतर त्यांनी त्याठिकाणी तिरंगा ध्वज फडकवला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तेथे नेऊन नमन केले.

 

Advt.

Web Title :  Pune Police News | Swapnil Garad of the Pune Police Force who went on the Mount Everest mission is ‘brain dead’

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा