पुण्यात लॉकडाऊनमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, 5 जणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाऊन कालावधीत जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. कॅम्प एज्युकेशनच्या मोकळ्या जागेत जुगार खेळत होते. पोलिसांनी 5 जणांना पकडले आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली आहे.

सागर सुरेश भागवत (वय 33), मनोज वामनराव काळे (वय 48), जितेंद्र राजकुमार गिडवानी (वय 37), सुरेश माणिक अवरंगे (वय 55) आणि मनोहर राजाराम पिल्ले (वय 63) अशी पकण्यात आलेल्याची नावे आहेत. लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे शहरात संचातबंदी असतानाही कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या मोकळ्या जागेत काहीजण जुगार खेळत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसानी त्याठिकाणी छापा टाकला असता, पाचजण जुगार खेळत असल्याचे दिसून आले. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाने त्यांना ताब्यात घेऊन वानवडी पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त विजय चौधरी, पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके, अण्णा माने, इरफान पठाण, संतोष भांडवलकर यांच्या पथकाने केली.