पुण्यात संचारबंदीचे 1000 गुन्हे दाखल, 650 वाहने जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात सचंरबदी आणि शहरात वाहने रस्त्यावर अण्यास बंदी असताना देखील काही जण वाहने घेऊन फिरत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केली आहे. 1 हजार 87 नागरिकांवर 188 नुसार गुन्हे दाखल केले आहेत. तर 650 वाहने जप्त केली आहेत.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्यात संचारबंदी करण्यात आली आहे. तर देश लॉकडाऊन केला आहे. अत्यावश्यक वगळता कोणालाही घरा बाहेर पडू नये, असे सांगण्यात आले आहे. मात्र तरीही काहीजण वाहने घेऊन फिरत आहेत. प्रथम पोलिसांनी अनेकांना काठीचा प्रसाद दिला. तर पुण्यात रस्त्यावर वाहने घेऊन येण्यास बंदी घालण्यात आली.

तरीही काहीजण वेगवेगळे कारणे सांगून रस्त्यावर फिरत आहेत. त्यामुळे आता वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसाकडून जोरदार कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पोलीस उगाच वाहने घेऊन फीरणाऱ्यांची वाहने जप्त करत आहेत. तर थेट 188 नुसार गुन्हे दाखल करत आहेत.

पोलिसांनी 22 मार्चपासून शहरात एकूण 1 हजार 87 जणांवर 188 नुसार कारवाई केली आहे. तर 650 वाहने जप्त केली आहेत. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे.