आता प्रत्येक पोलीस ठाण्यात “पोलीस कल्याण अधिकारी”

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन  –  शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात “पोलीस कल्याण अधिकाऱ्याची” नियुक्ती करावी. तसेच त्या अधिकाऱ्यांने कोरोनाचा प्रसार रोखण्यासोबतच त्यांनी आजारी असणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना योग्य उपचार तसेच सुविधा मिळतात का, यावर देखरेख करून त्यांना योग्य उपचार मिळतील हे पाहावे, अश्या सूचना पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिल्या आहेत.
शहरात कोरोनाची लागण झाल्यानंतर घरीच 8 दिवस राहून घरघुती उपचार घेतले आणि आजार बळावल्यानंतर रुग्णालयात दाखल केले. पण त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी या सूचना दिल्या आहेत.

पुणे शहर पोलीस दलातील 22 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात दोन कर्मचाऱ्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. नुकताच एका वाहतूक शाखेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. याची माहिती घेण्यात आली. त्यावेळी तो आजारी पडल्यानंतर जवळपास 8 दिवस घरीच राहून उपचार घेतले. तो रुग्णालयात गेला नसल्याचे समोर आले आहे, असे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. आजार जास्त झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याच्या भावाने त्याला रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. हे प्रकरण समोर आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेतली. तसेच आजारी असणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना लवकर उपचार मिळावे आणि त्यांनी आजार अंगावर काढू नये, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार प्रत्येक पोलीस ठाण्यात “पोलिस कल्याण अधिकारी” नेमण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार हे अधिकारी पोलीस ठाणे स्थरावर काम करणार आहेत. तसेच “सिक”मध्ये असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष सवांदसाधून त्यांची विचारपूस करायची आहे. तसेच त्यांना उपचार मिळतात का हे पाहणार आहेत.

—-चौकट—

1)  पोलीस ठाण्यात आजारी असणाऱ्याची त्यांचा पत्ता, फोन क्रमांक व ते कुठल्या रुग्णालयात उपचार घेतात याची माहिती घेऊन यादी तयार करावी.

2)  त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्ककरून त्यांच्याबाबाबत सध्यस्थितीची माहिती घ्यावी. तसेच त्यांना उपचार मिळण्यासाठी काही अडचण येत आहेत का, हे देखील पहावे.

3)  त्यांना कोरोनाची लक्षणे आहेत का, किंवा सोसायटी, घरात किंवा नातेवाईक यांना कोणाला लक्षणे आहेत का आणि ते कोणत्या कोरोना रुग्णाच्या संपर्कात आले का याची माहिती घ्यावी.

4)  ज्या अधिकारी व कर्मचारी याना कोरोना झाला असून ते सध्या उपचार घेत आहेत त्यांच्याशी संवाद साधून त्यांना काही अडचण आहे का हे पहावे. तसेच रुग्णालयाशी संपर्क साधता त्यांच्याशी विचारावे व उपचार व्यवस्थित होतात ना याबाबत पहावे.

5)  जे उपचार घेऊन घरी गेले ते कुठे क्वाराटाईन आहेत त्यांना काही अडचणी आहेत का याचे देखील माहिती घ्यायची आहे.

6)  पोलिसांना कोरोनापासून बचावासाठी दिलेले मास्क, सॅनी टायझर व इतर साहित्याचे वाटप झाले का काही कमतरता आहे का हे देखील पहायचे आहे.

7)  प्रत्येक पोलिस ठाण्यात अंतर्गत असणाऱ्या रुग्णालये यांच्याशी संपर्क साधावा तसेंच ते कोरोनाची चाचणी विनामूल्य करू शकतात का हे पहावे. व आवश्यकत्यानुसार टेस्टकरून घ्यायची आहे.

8)  कोरोना बाधित क्षेत्रात कर्तव्यास असणारे किंवा राहणारे आणि ते पोलिस ठाण्यात कर्तव्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची आवश्यकतेनुसार चाचणी घेण्यात यावी.

9)  तसेच पोलिस ठाणे स्थरावर कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना झाल्या आहेत का. तसेच त्या पूर्ण न झाल्यास त्या पूर्ण कराव्यात.

—चौकट—

पोलीस ठाणे स्थरावर नेमलेल्या “पोलीस कल्याण अधिकारी” यांच्यावर देखरेख अधिकारी म्हणून सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांची नेमणूक केली आहे.

—चौकट—

एसीपी सतीश गोवेकर यांनी एक व्हाट्सअप ग्रुप तयार करायचा आहे. त्यात प्रत्यके पोलीस ठाण्यातील “पोलीस कल्याण अधिकारी” दररोजची सर्व माहिती देतील. त्यावर देखरेखकरून गोवेकर यांनी अंमलबजावणी करायची आहे. तसेच त्याबाबत वरिष्ठांना सांगायचे आहे.