Pune Rape Case | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, जबरदस्तीने दुसऱ्यासोबत संबंध ठेवण्यास भाग पाडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Rape Case | लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) तरुणीसोबत वारंवार शारीरिक संबंध (Physical Relationship) प्रस्थापित केले. त्यानंतर लग्न करण्यास नकार देऊन संबंध ठेवतानाचे मोबाईलमध्ये केलेले चित्रीकरण व न्युड फोटो व्हायरल (Nude Photos Viral) करण्याची धमकी देऊन इतरांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडले. हा प्रकार सन 2019 ते 2023 या कालावधीत डेक्कन येथे आरोपीच्या घरात घडला आहे.

याबाबत 31 वर्षीय तरुणीने (मुळ रा. उस्मानाबाद) शनिवारी (दि.30) डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून सतिश डिकोस्टा/ऑगस्टीन पगारे (वय-42 रा. म्हात्रे ब्रीज, डेक्कन) याच्यावर आयपीसी 376, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

महिला सहायक पोलीस निरीक्षक वर्षा शिंदे (API Varsha Shinde) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डेकोरेशनचे काम करतो. फिर्यादी आणि आरोपीची ओळख 2019 मध्ये झाली. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांना सतीश डिकोस्टा असे नाव सांगितले. त्यानंतर डिकोस्टाने फिर्यादी यांना घरी बोलावून घेत लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. आरोपीने संबंध ठेवतानाचे चोरुन चित्रीकरण व न्युड फोटो त्याच्या मोबाईल मध्ये काढले.

फिर्यादी यांनी लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्न करण्यास नकार दिला.
मोबाईल मधील व्हिडीओ व फोटो दाखवून ब्लॅकमेल (Blackmail) करत मित्रांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडले.
तसेच इतर लोकांबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यास सांगून फिर्यादी यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले.
याबाबत पोलिसांकडे तक्रार केली तर माझे राजकीय व्यक्तींसोबत संबंध असून तू वेश्या व्यवसाय करत असल्याचे सिद्ध करेन,
अशी धमकी दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास एपीआय वर्षा शिंदे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Court News | WhatsApp द्वारे हॉटेलमध्ये चालवल्या जाणाऱ्या बालेवाडी येथील हायप्रोफाईल सेक्स रॅकेट मधील आरोपीला न्यायालयाकडून जामीन मंजूर

Supriya Sule On BJP | सुप्रिया सुळेंचा भाजपावर गंभीर आरोप, भाजपाने आमचे घर फोडले, मोठ्या भावाची बायको आईसारखी…

Chhagan Bhujbal | छगन भुजबळ नाशिकमधून लोकसभा लढवणार?