Pune Rape Case | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, पुण्यातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Rape Case | लग्नाचे आमिष दाखवून पाचगणी येथील तरुणीवर पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केला. हा प्रकार जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत पुणे, पाचगणी, बावधन, शिरवळ येथे घडला आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथे राहणाऱ्या तरुणावर समर्थ पोलिसांनी (Samarth Police Station) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी येथील 32 वर्षीय तरुणीने रविवारी (दि.18) समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन निलेश अनिल सिरसवाल (वय-32 रा. पिंपरी चिंचवड) याच्यावर आयपीसी 376 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर लग्न करण्यास नकार देऊन फसवणूक केली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मनिषा गिरी करीत आहेत.(Pune Rape Case)

मारहाण करुन महिलेचा भरस्त्यात विनयभंग

वानवडी : दुचाकीवरून जात असताना कारने दुचाकीला धडक दिली. याचा जाब विचारला असता पतीला मारहाण करुन महिलेला अश्लील शिवीगाळ करुन भररस्त्यात विनयभंग केला. हा प्रकार शनिवारी (दि.17) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास पुणे सोलापूर रोडवरील विजय सेल्स येथील सिग्नलला घडला. याप्रकरणी मुंढवा येथे राहणाऱ्या 32 वर्षीय व्यक्तीने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली. यावरुन एमएच 12 डीवाय 5122 कारमधील महिला व एका व्यक्तीवर आयपीसी 354, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी हे त्यांची पत्नी व मुलीला घेऊन पुणे सोलापूर रोडवरील शेवकर वस्ती रोडने जात होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या कराची धडक त्यांच्या दुचाकीला बसली. याचा जाब विचारला असता आरोपींनी फिर्यादी यांना हाताने मारहाण करुन शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी यांच्या पती व लहान मुलीला मारहाण केली. आरोपींनी फिर्यादी यांच्या पत्नीला अश्लील शिवीगाळ करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. पुढील तपास वानवडी पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kolhapur Youth Suicide | धक्कादायक ! ग्राईंडर कटरने स्वत:चा गळा कापून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

ACB Trap Case | शेतीचा वीजपुरवठा सुरु होण्यासाठी त्यांनी वर्गणी काढून दिली लाच; त्रास देणार्‍या लाईनमनला लाच घेताना पकडले

Pune Lonikand Crime | अल्पवयीन मुलीसोबत लग्न करुन बलात्कार, आरोपी पतीला अटक

Sena Kesari 2024 In Pune | महेंद्र गायकवाड ठरला सेनाकेसरी 2024, पृथ्वीराज मोहोळवर मात करीत कोरले चांदीच्या गदेवर नाव

Pune Wagholi Crime | वाघोली पोलीस चौकीसमोर पटवून घेतलेल्या रोहिदास जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यु

Chatrapati Shivaji Maharaj Jayanti | किल्ले शिवनेरीवर शिवरायांचा जन्मोत्सव, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती, घोषणांनी दुमदुमला परिसर!

Sharad Pawar-Ajit Pawar | राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर आज सुनावणी