पुण्यातील राठी मेडिकल्सचे 33 व्या वर्षात पदार्पण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – काही वर्षांपूर्वी पुण्यात औषधे घेण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावे लागत होते. एखादे औषध खरेदी करण्यासाठी दूरवर जावे लागत असल्याने जंगली महाराज रोडवर सुनिल राठी यांनी 18 फेब्रुवारी 1988 मध्ये राठी मेडिकल्सची स्थापना केली. या मेडिकलचे उद्घाटन स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले होते. मंगळवारी (दि.18) या मेडिकलने 33 वर्षात पदार्पण केले आहे.
rathi
18 फेब्रुवारी 1988 रोजी पुण्यात राठी मेडिकलची सुरुवात सुनिल राठी यांनी करून औषध व्यवसाय क्षेत्रात प्रवेश केला. ज्या काळी रात्री 8.30 नंतर शहरात औषधे मिळणे दुरापास्त होते, तेव्हा वेळेचे नियोजन करून राठी यांनी रात्री 11 पर्यंत रूग्णांना औषधे उपलब्ध करुन दिली. तसेच सुनिल राठी यांनी केमिस्ट संघटना स्थापनेस व उभारणीमध्ये महत्त्वाचा वाटा उचलला आहे.

व्यवसायासोबत माहेश्वरी समाजातील सामाजिक संस्थेसाठी सुनिल राठी सदैव कार्यरत असतात. पत्नी माधवी व मुलगा प्रेम यांच्यासह ‘प्रेम फार्मासीया’ ह्या नावाने औषध निर्मिती क्षेत्रात देखील प्रवेश केला आहे. मंगळवारी राठी मेडीकल्सच्या वर्धापन दिनानिमित्त अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.