Pune : निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त शरद अवस्थी यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त शरद अवस्थी यांचे आज दुपारी ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८१ वर्षे होते. संध्याकाळी वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अवस्थी यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शरद अवस्थी हे १९९७ मध्ये पोलिस दलातून निवृत्त झाले होते. पुणे पोलिस दलात फरासखाना पोलिस ठाणे आणि वाहतूक शाखेत त्यांनी काम पाहीले होते. हजरजबाबी अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. शहरातील सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमासोबतच पोलिस दलाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते नेहमी सहभागी होत. हजरजबाबी आणि मिश्किल स्वभावामुळे सर्वच क्षेत्रातील व्यक्तिसंचय त्यांनी केला होता. अवस्थी यांच्या पश्‍चात एक विवाहीत मुलगा आणि एक विवाहीत मुलगी असा परिवार आहे.

You might also like