शिवाीजनगर न्यायालय CCTV च्या देखरेखीखाली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यासह देशभरात सीसीटीव्हीच्या निगरानीखाली पाहिले ठरलेल्या पुणे शहर आता शिवाजीनगर जिल्हा न्यायालयही सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली येणार आहे. सीसीटीव्ही बसविण्याच्या कामाला नुकतीच सुरूवात झाली असून, पुर्ण परिसरात 140 कॅमेरे बसणार आहेत. त्यामुळे आतील सुरक्षा बळकट होणार असून, पोलिसांना यांचा मोठा फायदा होणार आहे.

शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात देशभरात गाजत असणारे माओवादी, जर्मन बेकरी बॉम्ब स्फोट यासह वेगवेगळे महत्वाचे खटले सुरू आहेत. त्यासोबतच इतरही खटले सुरू असतात. त्यामुळे दररोज येणार्‍या पक्षकारांची मोठी संख्या असते. त्याच्या सुरेक्षाचा ताण प्रशासनावर पडतो. दरम्यान, न्यायालयात आरोपींना घेऊन आल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी नातेवाईक, चाहते, तसेच मित्रमंडळीं मोठ्या प्रमाणात येतात. न्यायालयातील प्रवेश द्वारांवर मेटल डिटेक्टर देखील आहेत. पण, त्याला मर्यादा येतात. न्यायालयातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करणे गरजेचे होते. त्यामुळे न्यायालयात बसविण्यात येणार्‍या सीसीटीव्हीमुळे न्यायालयातील अनुचीत प्रकरांवर आळा घालता येणे सोपे होणार आहे.

त्यामुळे आता न्यायालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. पुर्ण परिसरात एकूण 140 कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तीनही प्रवेशद्वार तसेच आतील भाग सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असणार आहे.

न्यायालयात महत्वाचे खटले सुरू आहेत. त्यासोबतच इतर खटल्याच्या निमित्ताने दररोज हजारो लोक येतात. न्यायालयाच्या आवारात काही वेळा वकीलांवर, आरोपींवर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे संवेदनशील असलेल्या जिल्हा न्यायालयात बसविण्यात येणार्‍या सीसीटीव्हीमुळे अनुचीत प्रकरांना आळा घालने सोपे होणार आहे. याचे रेकॉर्डींग पोलीस आयुक्तालयामध्ये होणार आहे.
अ‍ॅड. सचिन हिंगणेकर (उपाध्यक्ष, पुुणे बार असोसिएशन)