Pune : धक्कादायक ! वकिल उमेश मोरे यांचं शिवाजीनगर न्यायालयातून अपहरण करून खून केल्याच्या प्रकरणात पुणे बार असोसिएशनच्या सचिवाला अटक, पोलिस कोठडीत रवानगी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   वकिल उमेश मोरे यांचे अपहरण करून खून केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी पुणे बार असोसिएशनचे सचिव ऍड. घनश्याम दराडे यांना अटक केली आहे. बारच्या सचिवानाच याप्रकरणात पकडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यापूर्वी देखील एका वकिलाला पकडले आहे.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ऍड. मोरे यांचे 2 ऑक्टोबरला न्यायालयाच्या बाहेरन अपहरण झाले होते. यानंतर त्यांचा शोध घेतला जात होता. 15 दिवसांनी पोलिसांनी प्रकार उघडकीस आणत वकील रोहित शेंडे याच्यासह कपिल विलास फलके (वय 34, चिखली), दीपक शिवाजी वांडेकर (वय 28, आष्टी, जि. बीड) यांना अटक केली होती. त्यावेळी

त्यावेळी शिवाजीनगर न्यायालयातून अपहरण करत त्यांचा खुनकरून मृतदेह तामिनी घाटात नेला. तसेच त्याठिकाणी पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला होता. जमिनीच्या वादातून हा खून झाला असल्याची प्राथमिक समोर आले होते. दृश्यम चित्रपटाच्या कथेनुसार हा खून झाला होता. यानंतर या आरोपींकडे चौकशी सुरू होती. त्यात आता आणखी एका वकिलांचे नाव समोर आले आहे. पोलिसांनी पुणे बार असोसिएशनचे सध्याचे सचिव ऍड. घनश्याम दराडे याला अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता 31 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

राहुल शिंदे हे वकील आहेत. ते शिवाजीनगर न्यायालयात वकिली करतात. तर आरोपी कपिल फलके आणि शेंडे यांच्यावर यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत. शेंडे याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात लाचेचा गुन्हा दाखल. त्यात मयत मोरे हे तक्रारदार होते. या गुन्ह्याला बहुचर्चित शहरातील एका जमिनीच्या वादाची किनार आहे.