पुणे ST महामंडळाचा रोज बुडतोय ‘एवढा’ महसूल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  एसटी महामंडळाने प्रवाशांना पूर्ण क्षमतेने प्रवास करण्याची परवानगी दिली असली तरी त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही आहे. अनेक एसटी बस रिकाम्याच धावत आहेत त्यामुळे रोज सुमारे ९५ लाख रुपयांचा महसूल बुडत आहे. तसेच सध्या ज्या बस धावत आहे त्याचा खर्च आणि प्रत्यक्ष उत्पन्न यामध्ये मोठी तफावत असल्याने रोज १५ ते २० लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे. एसटी महामंडळाची आंतरजिल्हा बस सेवा २० ऑगस्ट पासून सुरु करण्यात आली आहे. त्या मध्ये फक्त जिल्हांतर्गत बस धावत होत्या. त्यानंतर आंतरजिल्हा बस सेवा सुरु करण्यात आली तेव्हा प्रवाशांमध्ये वाढ झाली.

एका बस मध्ये फक्त ५० टक्के प्रवाशी क्षमतेने प्रवास करणे बंधनकारक असल्याने एसटीला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. तो तोटा कमी करण्यासाठी मागील आठवड्यात पूर्ण क्षमतेने प्रवास करण्याचा निर्णय घेण्यात आला.परंतु त्यानंतरही फारसा फरक पडला नाही. एसटीच्या पुणे विभागात पुणे जिल्ह्यातील विविध विभागातून २७५ बस मार्गावर येत असतात. रोज सुमारे ९० हजार किलोमीटरचा प्रवास होत असून फक्त १८ हजार प्रवासी रोज प्रवास करत असतात. या प्रवासामधून फक्त १५ लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. लॉकडाऊनच्या अगोदर सुमारे ८०० बस रोज धावत होत्या. तर त्यातून सुमारे १ कोटी रुपये उत्पन्न मिळत होते. म्हणजे प्रति किलोमीटर ३५ रुपये उत्पन्न मिळत होते. तर रोज १ लाख प्रवासी प्रवास करत होते.

लॉकडाऊन पूर्वीची आणि आताची स्तिथी पाहता एसटीचा पुणे विभागाचा रोज सुमारे ९५ लाखांचा महसूल बुडत आहे. तसे पहिले तर ४० ते ४३ रुपये प्रति किलोमीटर पडत आहे त्यांची रोज मिळणाऱ्या उत्पनाशी तुलना केली असता रोज १८ ते २० लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे. इंधन खर्च भागवणे कठीण जात असल्याने एसटीकडून प्रवास वाढवण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. रिकाम्या धावणाऱ्या मार्गांवर नियंत्रण आणले जात आहे. तर जिकडे अधिक प्रवासी असलेल्या मार्गावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येत आहे असे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पुणे विभागाची स्थिती :

लॉकडाऊनपूर्वी सध्याची स्थिती
मार्गावर बस ८०० २७५
धाव ( किमी ) ३,१८,१३७ ९०१३८
उत्पन्न १,१०,८२,००० १५,१७,०००
प्रवासी सुमारे १,००,००० १८०००