विद्यापीठात अनधिकृत राहणार्‍या तरुणांचा मद्याच्या नशेत ‘गोंधळ’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अनधिकृत राहणार्‍या तरुणांनी मद्याच्या नशेत परिसरात चांगलाच गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. यामुळे विद्यापीठात नेमके चालले काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीसांनी दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचे मेडिकल करण्यासाठी पोलिसांनी औंध येथील रुग्णालयात नेले असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन तरुण वसतिगृह पाच क्रमांकात अनधिकृत राहत होते. दरम्यान, मंगळवारी दुपारी दोघेही मद्याच्या नशेत होते. त्यांनी वसतिगृहातच गोंधळ घालण्यास सुरूवात केली. यावेळी येथील सुरक्षा रक्षकांना बोलविण्यात आले. ही माहिती मिळताच विद्यार्थ्यांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती. सुरक्षा रक्षकांकडून याची माहिती चतुश्रृंगी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच, या दोन तरुणांना ताब्यात घेतले. दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना रात्रीपर्यंत या घटनेबाबत माहिती नव्हते. माध्यांनी याबाबत विचारल्यानंतर त्यांनी माहिती घेऊन सांगितले. त्यातही त्या मुलांची नावेही किंवा नेमका काय प्रकार झालेही त्यांना माहिती नसल्याचे समोर आले आहे.

पाच क्रमांकाच्या वसतिगृहात मंगळवारी काही तरूण गोंधळ घालत असल्याचे समजले. सुरक्षा रक्षकांनी पाहणी केली असता एका खोलीत काही जण दारू पीत असल्याचे आढळले. सुरक्षारक्षकांनी त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. हे तरूण सध्या विद्यापीठात शिकत नाहीत. या घटनेबाबत पोलीस तपास करत आहेत.

– सुरेश भोसले, सुरक्षा संचालकसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like