Pune : 29 जुलैला ‘डिस्चार्ज’ रुग्ण संख्या व व्हेंटीलेटरवरील रुग्णांची संख्या चारपटीने वाढली, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर वाढलेली रुग्णसंख्या संशयास्पद !

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे महापालिकेच्या कोरोना बाधितांच्या आकडेवारीमध्ये तसेच राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार्‍या रुग्णसंख्येच्या आकडेवारीमध्ये मोठ्याप्रमाणावर गोंधळ आहे. विशेष असे की १३ ते २३ जुलै दरम्यान जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये दररोज सुमारे ७ हजारांपर्यंत टेस्ट केल्या जात असताना १३०० ते १८०० दरम्यान रुग्ण आढळत होते. मात्र, २९ जुलैला अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुणे दौर्‍याच्या एक दिवस अगोदर तब्बल २ हजार ५४३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर २८ जुलैला व्हेंटीलेटरवर असलेल्या रुग्णांची संख्या ९८ होती, ती २९ जुलैला थेट चौपटीने वाढून ४३२ इतकी झाल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरून समोर येत आहे.

महापालिकेच्या हद्दीमधील रुग्णसंख्येचा आकडा ५० हजारांच्या पुढे गेला असून बरे झालेल्या रुग्णांची संख्याही १३०० पर्यंत पोहोचली आहे. परंतू या माहितीमध्ये आणि राज्य शासनाकडून प्रसिद्ध करण्यात येणार्‍या माहितीमध्ये मोठी तङ्गावत असल्याचे यापुर्वीही स्पष्ट झाले असून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीही संगणकावरील नोंदणीमुळे ही तफावत असल्याचे मान्य केले होते. तसेच यामध्ये सुधारणा करण्याचेही मान्य केले होते. मात्र, ३० जुलैला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुण्यात कोरोनासंदर्भात आढावा बैठक घेण्याच्या आदल्या दिवशी अर्थात २९ जुलैला तब्बल २ हजार ५४३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यादिवशी गंभीर रुग्णसंख्या ९२७ होती, त्यापैकी ४७१ रुग्ण व्हेंटीलेटरवर होते. मात्र, २८ जुलैला ८४५ गंभीर रुग्णांपैकी ९८ रुग्णच व्हेंटीलेटरवर होते. विशेष असे की २८ जुलैला ५९१ रुग्णांणाच डिस्चार्ज देण्यात आला होता.

ADV

महापालिकेच्यावतीने देण्यात येत असलेल्या आकडेवारीमध्ये डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण तसेच व्हेंटीलेटरवर असलेल्या रुग्णांच्या संख्येचा ग्राङ्ग एका दिवसांत अचानक चौपटीने वाढल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आकडेवारी मध्ये कुठलिही तफावत नसल्याचे तसेच मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर काही कमी अधिक दाखविण्याचा कुठलाही प्रयत्न झालेला नाही. लॉकडाउनच्या काळात मोठ्याप्रमाणात टेस्ट घेण्यात आल्याने रुग्णसंख्या वाढली आहे. ज्यांना लक्षणे नाहीत, अशा रुग्णांना ७ ते १० दिवसांच्या काळात डिस्चार्ज देण्यात येत आहे. महापालिकेच्यावतीने प्रोटोकॉलनुसार औषधोपचार झाल्यानंतर रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला का नाही, याचीही तपासणी करण्यात येत असल्याने एकाच दिवसांत डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसते. रुग्णांना ऑक्सीजन बेड तसेच गंभीर रुग्णांनाही व्हेंटीलेटर उपलब्ध करुन दिल्याने व्हेंटीलेटरवरील रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. – सौरभ राव, विशेष कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालय.

महापालिकेच्यावतीने जाहीर करण्यात येणार्‍या आकडेवारीमध्ये तङ्गावत आहे. ही बाब यापुर्वीही उपमुख्यमंत्री तसेच काल झालेल्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. आकडेवारीमधील तङ्गावतीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरू नये, अशी यामागील अपेक्षा आहे. याउलट नागरिकांना पारदर्शकपणे माहिती मिळावी, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

– मुरलीधर मोहोळ
मागील पाच दिवसांतील कोरोना बाधितांची सद्यस्थिती
दिनांक         गंभीर रुग्ण       व्हेंटीलेटरवरील रुग्ण    मृत्यू      डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण

३० जुलै            ९२७                     ४७१                     ३०                      १३१५
२९ जुलै              ८४५                    ४३२                   ३९                      २५४३
२८ जुलै              ७४२                    ९८                     ३३                       ५९१
२७ जुलै              ७४४                 ९७                      १६                        ८९६
२६ जुलै               ६८२                 १०५                    १३                         ११७५